लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जुनी पेन्शन योजना हा संघटनेचा प्रमुख अजेंडा आहे. वेळ आली तर शिक्षकांच्या न्याय मागणीसाठी रस्त्यावर उतरू. विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ हा कार्यकर्त्याच्या ताकतीवर लढा देणारी संघटना असून संघटनेशी प्रामाणिक राहून संघटनेचे हात बळकट करा, असे आवाहन विमाशीचे सरकार्यवाह सुधाकर अडबले यांनी केले.पवनी तालुक्यातील गोसे बुज येथील विनोद विदयालय व कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित विमाशीच्या प्रांतीय अधिवेशनात ते बोलत होते. यावेळी पाहुणे म्हणून जिल्हा परिषद सदस्य पार्वता डोंगरे, जिल्हा परिषद सदस्य होमराज कापगते, गोंडवाना विद्यापीठाचे सिनेट सदस्य अजय लोंढे, प्रांतीय उपाध्यक्ष अविनाश बडे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विकास राऊत, श्रीधर खेडीकर के. आर. ठवरे, विनोद शिक्षण संस्थेचे सचिव गंगाधर डोंगरे, विकास बडवाईक, अनमोल गजभिये, प्राचार्य तथा जिल्हा परिषद सदस्य चेतक डोंगरे, विनायक ढोक, चंद्रशेखर रहांगडाले आदी उपस्थित होते,अडबले म्हणाले, रोज नवीन पत्रक काढून शिक्षकांना अतिरिक्त ठरवणारे माजी शिक्षणमंत्री स्वत: अतिरिक्त झाले. जुन्या पेन्शनकरिता ना.विजय वडेट्टीवार यांना निवेदन देऊन चर्चा केली असून पहिल्या कॅबिनेटच्या सभेमध्ये हा मुद्दा लावून जुनी पेन्शनचा विषय मार्गी लावणार असे संघटनेला आश्वासन दिले आहे. सभागृहामध्ये विमाशीचा प्रतिनिधी नसला तरी विमाशी थांबली नाही आणि कधी थांबणारही नाही, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.जिल्हा परिषद सदस्य असलो तरी प्रथम विमाशीचा लढवय्या सैनिक आहे. त्यामुळे संघटनेशी कायम बांधिलकी राहील, विमाशीमुळेच मला राजकीय क्षेत्रात जाण्याची संधी मिळाली, असे मत जिल्हा परिषद सदस्य होमराज कापगते यांनी केले. या प्रसंगी विमाशी संघाशी एकनिष्ठ असणारे जिल्ह्यातील सेवानिवृत्त शिक्षक व मुख्याध्यापक यांना शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला तसेच भारत स्काऊट गाईड राज्यशिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक भिष्मा टेंभूर्णे व स्काऊटचे आयुक्त अंकुश हलमारे यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी वरिष्ठ व निवड श्रेणी, इयत्ता सहावी ते आठवीची संच मान्यता, अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन, आश्रम शाळा शिक्षकांचे समायोजन व एक तारखेला नियमित वेतन, जिल्हा परिषद शाळा शिक्षकांचे प्रश्न, २० टक्के व वाढीव ४० टक्के अनुदान वाटप,विना अनुदान शाळांचे अनुदान टप्पे, इत्यादी विषयावर ही मार्गदर्शन केले,प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष सुधाकर देशमुख यांनी तर अहवाल वाचन जिल्हा कार्यवाह राजेश धुर्वे यांनी केले. संचलन कैलास नन्नावरे व आभार शुभांगी तलमले यांनी मानले. कार्यक्रमासाठी परमानंद सेलोकर, मोरेश्वर जुमळे, गौरव विश्वनाथ दूधपचारे, मन्साराम जिभकाटे, बी.एन.शेंडे, विवेक मोटघरे, पुरुषोत्तम लांजेवार, मनोज अंबादे, धीरज बांते, श्याम गावळ, भाऊराव वंजारी, पंजाब राठोड, अनंत जायेभये, जागेश्वर मेश्राम, विनोदकुमार मेश्राम, यादव खोब्रागडे, विजय देवगिरीकर, जनार्दन देशमुख, सुरेश जिभकाटे, देवानंद चेटुले, अनिल कापटे, बोळणे, नरेश ठवकर, मनोहर कापगते, राजू गभणे, रोहित मरस्कोल्हे, पुडके, बी. आर. मेश्राम, अरविंद पुसतोडे, नाकाडे, मिलिंद डोंगरे, राधेश्याम मुरकुटे, दिनकर ढेंगे, माणिक बागमारे, अर्चना भोयर, छाया वैद्य, कांता कामथे, माधुरी मस्के, शमशाद सय्यद, कुंदा लांजेवार, सी. आर. नागे, डोकरीमारे, नंदेशवर उपस्थित होते.
जुन्या पेंशनसाठी रस्त्यावर उतरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 04, 2020 5:00 AM
जुनी पेन्शन योजना हा संघटनेचा प्रमुख अजेंडा आहे. वेळ आली तर शिक्षकांच्या न्याय मागणीसाठी रस्त्यावर उतरू. विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ हा कार्यकर्त्याच्या ताकतीवर लढा देणारी संघटना असून संघटनेशी प्रामाणिक राहून संघटनेचे हात बळकट करा, असे आवाहन विमाशीचे सरकार्यवाह सुधाकर अडबले यांनी केले.
ठळक मुद्देसुधाकर अडबले : विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे प्रांतीय अधिवेशन