आॅनलाईन लोकमतभंडारा : शिकवणी वर्गासाठी जात असल्याचे सांगून घरून गेलेल्या माझ्या मुलीचा मृतदेह चार दिवसानंतर वैनगंगा नदीपात्रात आढळून आला. तिची आत्महत्या नसून खूनच करण्यात आल्याचा आरोप मृत प्रतीक्षा बागडे हिचे वडील प्रकाश बागडे यांनी आयोजित पत्रपरिषदेत केला.या खून प्रकरणात भंडारा पोलिसांनी अद्याप कुणालाही अटक केलेली नाही. त्यामुळे या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे देण्यात यावा अशी मागणी करून प्रकाश बागडे म्हणाले, प्रतीक्षा ही १३ जानेवारीला सायंकाळी घरून गेली. त्यानंतर घरी पोहचली नाही.दुसºया दिवशी पोलिसांना तक्रार दिली. परंतु त्यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले नाही.१४ जानेवारीला प्रतीक्षाच्या मोबाईलवर संपर्क साधला असता फोन वाजतच राहिला. परंतु कुणी उचलला नाही. त्यामुळे प्रतीक्षाची मैत्रिण हिना हिच्या मोबाईलवरून फोन लावला असता तो फोन सचिन नामक तरुणाने उचलला.त्यानंतर सलमान नामक मुलगा घरी येऊन रिपोर्ट देऊ नका, मी प्रतीक्षाला शोधून आणतो, असे म्हणून निघून गेला. त्यानंतर आम्ही पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेलो असता हाच मुलगा पोलीस ठाण्यात आला. त्यावेळी आम्ही हाच मुलगा घरी आल्याचे पोलिसांना सांगूनही त्यांनी त्याला काही वेळातच सोडून दिले. त्यामुळे या प्रकरणात पोलिसांची भूमिका संशयास्पद दिसत आहे. शवविच्छेदन करणाºया डॉक्टरांनीही अहवाल पोलिसांना दिला असून याबाबत पोलीसही काही सांगत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.याप्रकरणात भंडारा पोलीस ठाण्याचे ठाणेदारांना निलंबित करून या प्रकरणाची सीआयडी चौकशी करण्यात यावी आणि आम्हाला न्याय देण्यात यावा अशी मागणी प्रकाश बागडे यांनी केली. पत्रपरिषदेला प्रतीक्षाची आई आणि काँग्रेस कमेटीचे जिल्हा महासचिव मनोज बागडे उपस्थित होते.
मुलीची आत्महत्या नसून तिचा खूनच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 10:35 PM
शिकवणी वर्गासाठी जात असल्याचे सांगून घरून गेलेल्या माझ्या मुलीचा मृतदेह चार दिवसानंतर वैनगंगा नदीपात्रात आढळून आला.
ठळक मुद्देवडिलाचा आरोप : प्रतीक्षा बागडे मृत्यू प्रकरण