मोहाडी : राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती योजना परीक्षेत भंडारा जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीत मुलीच अधिक झळकल्या. यावरून शिक्षण क्षेत्रात मुलीच भारी आहेत, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने २०२०-२१ मध्ये आठवीच्या विद्यार्थ्यांची राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षा ६ एप्रिलला घेण्यात आली होती. १८ ऑगस्टला गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाली. यात भंडारा जिल्ह्यातील १४३ विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत. यात ९३ मुलींनी बाजी मारली. मुलांपेक्षा पुढे राहून आम्ही मुलीच भारी आहोत हे दाखवून दिले. राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेसाठी राज्यासाठी ११ हजार ६८२ शिष्यवृत्ती कोटा निश्चित करण्यात आला. तसेच गुणवत्ता यादी तयार करताना विविध संवर्गांतील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती आरक्षण दिले गेले आहे. दिव्यांग संवर्गांतील विद्यार्थ्यांसाठी ४ टक्के आरक्षण दिले गेले आहे. यात भंडारा जिल्ह्यातील सर्वसाधारण संवर्गात ५९ विद्यार्थी, अनुसूचित जातींतील १९ विद्यार्थी, अनुसूचित जमाती संवर्गातील २७ विद्यार्थी, एनटी-बी संवर्गातील ४ विद्यार्थी, एनटी-डी संवर्गातील १ विद्यार्थी, ओबीसी संवर्गातील २९ विद्यार्थी, एसबीसी संवर्गातील ३ विद्यार्थी व ईडब्ल्यूएसमधून १ असे विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत. यात सर्वांत अधिक ९३ विद्यार्थिनी शिष्यवृत्तीस पात्र ठरल्या आहेत. विविध संवर्गांतील प्रथम गुणानुक्रमे सर्वसाधारण संवर्गात निवड केली जाते. अशा सर्वसाधारण संवर्गात २० मुलींनी बाजी मारली आहे. ओबीसी २९ गटांत १७ मुली व १२ मुले, एनटी- बी प्रवर्गात ४ मुलींनी कब्जा केला. ईडब्ल्यूएसमध्ये हुशेन इंशेरा फिदा ही एकमेव मुलगी पात्र झाली. तसेच अनुसूचित जमाती प्रवर्गात २० मुली पात्र व ७ मुले पात्र झाली आहेत. सर्व प्रवर्गांत ५० मुले शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरली आहेत.
210821\images (1).jpeg
शिष्यवृत्ती परीक्षेत मुलांपेक्षा मुलीच भारी....!
एनएमएमएस परीक्षा: ९३ मुली पात्र