लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : नागपूर विभागीय शिक्षण मंडळाने घेतलेल्या दहावीच्या परीक्षेत मुलांपेक्षा मुलीच भारी ठरल्या. मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ७४.५६ तर मुलांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ५७.८६ टक्के आहे. जिल्ह्यातील मुलांपेक्षा १७ टक्के मुली अधिक उत्तीर्ण झाल्या असून जिल्ह्यातून अव्वल येण्याचा मानही मुलीनेच पटकाविला आहे.भंडारा जिल्ह्यातील दहावीच्या परीक्षेला १७ हजार ५९० विद्यार्थी बसले होते. त्यामध्ये ८ हजार ५५९ मुलींचा समावेश होता. जिल्ह्याचा निकाल ६५.९९ टक्के लागला असला तरी मुलीच्या उत्तीर्णतेची टक्केवारी मात्र सर्वांच्या डोळ्यात अंजन घालणारी आहे. जिल्ह्यातील ६ हजार ३८२ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. गत काही वर्षात मुलींच्या उत्तीर्णतेच्या टक्केवारीत वाढ होत असून यंदाही मुलींनीच बाजी मारली आहे. नागपूर विभागात जिल्हा तिसऱ्या क्रमांकावर असला तरी मुलांची उत्तीर्णतेची घसरलेली टक्केवारी सर्वांसाठी चिंतेची बाब आहे.मुलांची टक्केवारी घसरण्यामागचे कारण म्हणजे यावर्षी बंद झालेले प्रात्यक्षिकाचे गुण आणि दहावीच्या अभ्यासाकडे मोबाईल व इतर कारणामुळे झालेले दुर्लक्षही असल्याचे सांगितले जात आहे. नवीन अभ्यासक्रमाचा फटकाही अनेकांना बसला आहे. महागड्या व नामवंत कोचिंग क्लासेसमध्ये ट्युशन लावल्यानंतरही अनेक विद्यार्थी ७० टक्केच्या वर पोहचले नाहीत. काही तर चक्क नापास झाल्याचे दिसून येत आहे.गतवर्षीपर्यंत दहावीच्या विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकाचे गुण दिले जात होते. परंतु यावर्षी पासून हे गुण केवळ गणित व विज्ञान विषयापुरतेच मर्यादित करण्यात आले. त्याचा परिणाम निकालाच्या टक्केवारीवर झाला आहे. त्यातही मुलांची टक्केवारी आणखीनच घसरली आहे. गत काही वर्षांपासून मुलींच्या गुणवत्तेत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यातून वैष्णवी हिंगे आणि प्रतीक्षा वेधपुरीया अव्वल ठरल्या. तर महिला समाजची शिवानी कांबळे, लाखनीच्या युनिव्हर्सलची मिताली देशपांडे या ९४.४० टक्के गुण घेवून दुसºया स्थानी आल्या.
दहावीच्या परीक्षेत मुलांपेक्षा यंदाही मुलीच ठरल्या भारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 09, 2019 1:05 AM
नागपूर विभागीय शिक्षण मंडळाने घेतलेल्या दहावीच्या परीक्षेत मुलांपेक्षा मुलीच भारी ठरल्या. मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ७४.५६ तर मुलांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ५७.८६ टक्के आहे. जिल्ह्यातील मुलांपेक्षा १७ टक्के मुली अधिक उत्तीर्ण झाल्या असून जिल्ह्यातून अव्वल येण्याचा मानही मुलीनेच पटकाविला आहे.
ठळक मुद्दे७४.५६ टक्के मुली उत्तीर्ण । जिल्ह्यातून दोन मुली आल्या प्रथम