शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मोफत’ घोषणांचा सपाटा; वित्तीय भार पेलणार कसा? राज्यावर आताच आहे साडेसात लाख कोटींचे कर्ज
2
आजचे राशीभविष्य, ७ नोव्हेंबर २०२४ : घरात आनंदाचे वातावरण राहील, मानसिक प्रसन्नता जाणवेल
3
EVM हॅक करून तुम्हाला जिंकून देतो; ५ लाख न दिल्यास पराभव करेन, उद्धवसेनेच्या उमेदवाराकडे मागितली खंडणी
4
हल्ला, फसवणूक, विनयभंग अन् जुगाराचे आरोपी निवडणुकीच्या रिंगणात, चारपैकी एका उमेदवाराविरोधात न्यायालयीन खटला प्रलंबित
5
वरळीत वरचष्मा कोणाचा? आदित्य ठाकरे विरुद्ध देवरा आणि देशपांडेंच्या उमेदवारीमुळे रंगत
6
Ind Vs Aus: "ऑस्ट्रेलिया भारताला ३-१ ने नमवेल", रिकी पाँटिंगने केलं भाकित
7
महिलांना दरमहा ३ हजार रुपये, राहुल गांधी यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीची गॅरंटी
8
बुरखा घालून मंगळसूत्र चोरणाऱ्या महिलेला बेड्या, लोहमार्ग पोलिसांकडून साथीदारालाही अटक
9
वर्ध्यातील इवोनिथ कंपनीत स्फोट; २२ कामगार भाजले, तिघांना नागपूरला हलविले
10
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
11
पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल
12
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
14
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
15
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
16
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
17
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
18
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
19
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर

हक्काचा मोबदला द्या; अन्यथा आत्महत्या करू

By admin | Published: January 31, 2016 12:31 AM

महिलांचे सक्षमीकरण होणार, या उद्देशाने राबूनही मोबदला मिळाला नाही. मोबदल्यासाठी अधिकाऱ्यांकडून टाळाटाळ होत आहे.

बचतगटातील महिलांचा इशारा : माविमच्या गैरव्यवहाराची चौकशी कराभंडारा : महिलांचे सक्षमीकरण होणार, या उद्देशाने राबूनही मोबदला मिळाला नाही. मोबदल्यासाठी अधिकाऱ्यांकडून टाळाटाळ होत आहे. त्यामुळे आत्महत्येशिवाय आता पर्याय उरलेला नाही, असा इशारा अन्नपूर्णा महिला उत्पादक बचत गट भंडारा, सहयोग महिला उत्पादक गट मोहाडी, अंकुर कोसा उत्पादक गट सीतेपार येथील महिलांनी आयोजित पत्रपरीषदेत दिला आहे. अन्नपूर्णा महिला उत्पादक बचत गटाची माहिती देताना जयनंदा हुमणे व जया मेहर यांनी माविमंच्या जिल्हा समन्वयक ज्योती निंबोळकर यांच्याकडून अन्याय झाल्याचा पाढा वाचला. त्या म्हणाल्या, १५ आॅगस्ट २०१५ पासून जिल्हा परिषद आवारामध्ये बचत गटातील महिलांचे उपहारगृह सुरु आहे. उपहारगृह सुरु करण्याकरिता ७ लाख ६० हजार रुपयांचे कर्ज घेण्यात आले. परंतु माविमंच्या अधिकारी निंबोळकर यांच्या अवाढव्य खर्चामुळे बचत गटातील महिलांवर भुर्दंड बसला आहे. उपहारगृहात काम करणाऱ्या महिलांना प्रतीमाह ३ हजार रुपये व प्रती दिन प्रवास भाडे ५० रुपये देण्याचे ठरविले होते. परंतु आजपर्यंत महिलांना एकही रुपया मिळाला नाही. उपहारगृहा करिता जिल्हाधिकारी कार्यालयाकडून २ लाख रुपयांचे अनुदान मंजूर झाले. याचा हिशोब जिल्हा समन्वयक निंबोळकर यांनी दिला नाही. माविमच्या गैरव्यवहाराची चौकशी कराभंडारा : उपहारगृहासाठी जवळपास ९० हजार रुपये खर्च केलेला आहे. मोबदल्याविषयी उडवाउडवीचे उत्तर मिळत आहे. जिल्हाधिकाऱ्यांना या समस्येविषयी निवेदन देण्यात आले. मात्र त्यांच्याकडूनही टाळाटाळीचे उत्तर मिळत आहे. अंकुर कोसा उत्पादक गटातील महिला झुलवंता झंझाड, भारती झंझाड, मंजुषा झंझाड, निर्मला सार्वे यांनी माविमंच्या प्रकल्प संचालक यांच्या समस्यांचा पाढाच वाचला. त्या म्हणाल्या, २०१२ पासून कोसा व्यवसाय, स्टेशनरी व्यवसाय मोहाडी येथे कन्हाळगाव येथील महिलांच्या सहकार्याने सुरु करण्यात आले. महिलांना विविध ठिकाणाहून कर्ज घ्यायला लावून व्यवसाय करण्यास माविमंच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. व्यवसायामध्ये १५ लाख ७५ हजारांचे कर्ज महिलांच्या नावे घेण्यात आले आहेत. त्यापैकी ९ लाख ५ हजार रुपये खर्च करण्यात आले. आजपावेतो काम करूनही त्यांना छदामही मोबदला मिळाला नाही. कर्ज परतफेडीसाठी बँकेचे अधिकारी तगादा लावत आहेत. व्यवसाय वृद्धींगत होण्यासाठी महिलांसह पुरुषांनीही हिरहिरीने सहभाग घेतला. मात्र कामाचा मोबदला मिळाला नाही. परिणामी उपासमारीचे संकट ओढावले आहे. आर्थिक व्यवहाराची चौकशी करून महिलांना न्याय मिळावा, अशी मागणी बचत गटातील महिलांनी केली आहे. सहयोग महिला उत्पादक बचत गट २०१२ पासून आॅगस्ट २०१५ पर्यंत कार्यरत होते. येथील महिलांनी ब्लॉक प्रिंटींग प्रशिक्षण घेतले. या गटात १५ महिला १०० रुपये प्रतिदिन प्रमाणे काम करीत होत्या. कर्ज काढून व्यवसाय उभारला, साहित्य खरेदी केले. घरात अठराविश्वे दारिद्र्य असताना अधिकाऱ्यांकडून मानसिक त्रास होत आहे. न्यायासाठी अधिकाऱ्यांच्या कार्यालयाच्या येरझारा मारूनही न्याय मिळत नाही. पत्रपरिषदेला गणेशपूरच्या सरपंच वनिता उके, नंदा हुमणे, जया मेहर, झुलवंता झंझाड, निर्मला सार्वे, आरती झंझाड, प्रज्ञा सुखदेवे, सुनंदा नेवारे उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)