शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

अन्यायग्रस्तांना आर्थिक मदत द्या

By admin | Published: January 04, 2017 12:46 AM

राष्ट्रीय महामार्गासह भंडारा शहरातील अतिक्रमण काढण्यात आले. यामुळे शेकडो कुटुंबियांवर उपासमारीचे संकट ओढवले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी : प्रकरण शहरातील अतिक्रमण काढल्याचे भंडारा : राष्ट्रीय महामार्गासह भंडारा शहरातील अतिक्रमण काढण्यात आले. यामुळे शेकडो कुटुंबियांवर उपासमारीचे संकट ओढवले आहे. त्यामुळे अतिक्रमण काढलेल्या प्रत्येक कुटुंबास १० हजार रुपये महिना शासनाने आर्थिक सहाय्य द्यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे. भंडारा नगरपालिका हद्दीत व्यवसायाच्या दृष्टीने अनेक बेरोजगार युवक तथा नागरिकांनी कुटुंबाचा उदरनिर्वाह चालावा यासाठी रस्त्यालगतच्या जागांवर व्यवसाय थाटले. अशा व्यवसायाच्या माध्यमातून अनेकांचे कुटुंब सुरळीत सुरु आहे. दिवसागणिक अशा व्यवसायीकांची मोठी संख्या भंडारा शहरात दिसू लागली. शहरातील बाजारपेठेसह अन्य मार्गावर रस्त्याच्या कडेला असलेल्या फुटपाथवर व्यवसाय थाटणाऱ्या नागरिकांवर जिल्हा व पालिका प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला. मागील अनेक वर्षांपासून नागरिकांनी संसाराचा गाढा या व्यवसायाच्या माध्यमातून सुरु ठेवलेला असताना प्रशासनाने त्यांच्यावर केलेली ही कारवाई त्यांना आर्थिक संकटात लोटणारी आहे. शासनाने अतिक्रमणधारकांना हॉकर्स झोन तयार करून द्यावे व फुटपाथवर व्यवसाय थाटणाऱ्यांना नियमित व्यवसाय करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने आता लावून धरली आहे. अतिक्रमण करून व्यवसाय थाटणाऱ्यांवर या कारवाईमुळे उपासमारीचे संकट ओढावले असून सर्वांच्या कुटुंबियांना शासनाने किमान १० हजार रुपये प्रति महिना आर्थिक सहाय्य द्यावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली. याबाबत त्यांनी जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री यांना निवेदन पाठविले आहे. शिष्टमंडळात माजी राज्यमंत्री नाना पंचबुद्धे, जिल्हाध्यक्ष मधुकर कुकडे, प्रदेश सचिव धनंजय दलाल, कृषी व पशुसंवर्धन सभापती नरेश डहारे, नगराध्यक्ष बाबूराव बागडे, नरेंद्र झंझाड, अ‍ॅड.विनयमोहन पशिने, भगवान बावनकर, नितीन तुमाने, महेंद्र गडकरी, जयंत वैरागडे, डॉ.जगदिश निंबार्ते, नरेंद्र बुरडे, डॉ.रविंद्र वानखेडे, मीना कुरंजेकर, जुमाला बोरकर, संजू सतदेवे, बबलू खान, किरण कुंभरे, अमर उजवणे, इकबाल खान, असद हुसैन, महेंद्र बारापात्रे, गजानन बादशहा, मौसम ठाकूर, बंटी वैद्य, क्रिष्णा उपरीकर, अक्षय रामटेके, अरुण अंबादे, मोनू गोस्वामी, स्वप्नील नशिने, अरविंद पडोळे, आहुजा डोंगरे, प्रदीप सुखदेवे, गणेश बानेवार, सोनू खोब्रागडे, मकसूद पटेल, राजपूत, गुड्डू भाई, रवी लक्षणे, क्रिष्णा गुणेवार, सोहेल अहमत. इ. कार्यकर्ते उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)