धान पिकाची शेती करण्यासाठी शेतकऱ्यांना दरवर्षी बँक व सावकारी कर्ज काढावे लागते. परंतु कधी अस्मानी, तर कधी सुलतानी संकट तसेच पर्यावरणीय बदलामुळे भात पिकावर वनस्पतीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होत असतो. तसेच कधी कोरडा तर कधी ओला दुष्काळ पडत असल्याने भात पिकाची मोठ्या प्रमाणात नासाडी होऊन पीक उत्पादनात बरीच घट येत असते. एवढेच नव्हे तर भात पिकाला खर्चावर आधारित हमीभाव मिळत नसल्याने शेतकरी बांधवांना आर्थिक फटका सहन करावा लागतो. यामुळे ते बँक व सावकारी कर्जाचा भरणा करू शकत नाही. अशी भयाण परिस्थिती निर्माण होत असल्याने येणाऱ्या पुढील खरीप हंगामात शेतीची मशागत कशी करावी, असा प्रश्न निर्माण होत असतो. मागील वर्षापासून कोरोना आजाराने थैमान घातल्याने शेती व्यवसाय धोक्यात आला. त्यामुळे रोजगाराअभावी शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडले असून, बाजारपेठेतून भात पिकाची बियाणे कशी विकत घ्यावी, असा प्रश्न शेतकरी बांधवांसमोर आवासून उभा ठाकला आहे.
निवेदनावर भीमशक्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश देशपांडे, मनोज मेश्राम, बाळकृष्ण शेंडे, एस.के. वैद्य, भागवत दामले, वामन कांबळे, माधव बोरकर, हरिदास बोरकर, अरुण ठवरे, उमाकांत काणेकर, विनाश खोब्रागडे, नितीश काणेकर, मच्छिंद्र टेंभुर्णे, संदीप बर्वे, हर्षवर्धन हुमने, अरुणा दामले, कल्पना वानखेडे, शुभांगी भुतांगे, संयोगिता खोब्रागडे, ज्योती मेश्राम, पुष्पा मुल, पपिता वंजारी, शारदा रंगारी, विभा रामटेके, माधुरी सुखदेवे, सुमन वंजारी, संघमित्रा गेडाम, अनु गेडाम, साधना मेश्राम, सरिता टेंभुर्णे, विद्या धारगावे, विद्या उंदीरवाडे यांनी केली आहे.