जिल्हा बीडीसीसी बँकेने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना २५ लाखांचे अपघाती विमा संरक्षण कवच लागू झाल्याची घोषणा भंडारा जिल्हा शिक्षण समन्वय समितीसमोर नुकतीच केली होती. त्या सॅलरी पॅकेज अंतर्गत प्रोफेसर बहेकार यांच्या कुटुंबाला २५ लाखांचे सॅलरी पॅकेज अंतर्गत २५ लाखांचे विमा संरक्षण कवच द्यावे, अशी मागणी शासनमान्य संघटना शिक्षक भारतीने केली आहे. यासंदर्भात शिक्षक भारतीचे जिल्हा कार्याध्यक्ष उमेश सिंगनजुडे यांच्या नेतृत्वात शिक्षक भारतीच्या शिष्टमंडळाने बीडीसीसी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बरडे व बँकेचे अधिकारी मंगेश बोरकर यांच्याशी चर्चा केली. बहेकार कुटुंबाला अपघाती विमा संरक्षण कवच लवकर द्यावे, यासंदर्भात बीडीसीसी बँकेला निवेदन देण्यात आले.
बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बरडे यांनी सॅलरी पॅकेज अंतर्गत २५ लाखांचे अपघाती विमा संरक्षण कवच बँक १०० टक्के बहेकार कुटुंबाला देईल, अशी ग्वाही शिक्षक भारतीच्या शिष्टमंडळाला दिली. यावेळी शिक्षक भारतीचे जिल्हा सहकार्यवाह नितेश पुरी, जिल्हा प्रवक्ता गिरीश लुटे, मुख्याध्यापक हरेंद्र सिंगनजुडे, संघटक सिद्धार्थ खोब्रागडे, तिलक हलमारे, उत्तम माने, माध्यमिक मुख्याध्यापक संघाचे जिल्हा कार्यवाह विकास वंजारी व उच्च माध्यमिक विभागाचे कार्यवाह प्रा. विनोद हटवार उपस्थित होते.