भंडारा : फुटपाथ दुकानदारांना शासकीय दराप्रमाणे गाळे उपलब्ध करून द्या, या मागणीसाठी एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले, तसेच फुटपाथ शिवसेना संघटनेच्या वतीने निवेदनही देण्यात आले.
भंडारा शहरात शेकडो फुटपाथ दुकानदार आहेत. या दुकानदारांना पर्यायी व्यवस्थेसाठी शासनाने आदेश निर्गमित केले आहेत. पथविक्रेता संगणक प्रणालीद्वारे त्यांचे सर्वेक्षणही झाले आहे. या यादीतील विक्रेत्यांकडून प्रतिदिवस १० रुपयांप्रमाणे नगर परिषद वसुलीही करीत आहे; परंतु त्यांना शासकीय दराप्रमाणे गाळे उपलब्ध करून दिले जात नाहीत. यासाठी भंडारा जिल्हा परिषदेसमोर धरणे देण्यात आले. यावेळी संघटनेचे सचिव जयराम ठोसरे, जिल्हाध्यक्ष अख्तर बेग मिर्झा यांच्यासह दलिराम नागपुरे, शंकर बावनकुळे, अर्शद अली, तौशीफ दमदार, रवी भजनकर, धनंजय समरीत, नीलेश नागोसे, अविनाश नागोसे, राकेश मोटघरे, ओमप्रकाश ठाकरे, सतीश लांजेवार, विष्णू कुंभलकर, रामचंद्र नंदुरकर यांच्यासह अनेक जण उपस्थित होते.