मोहाडी येथे माविंमच्या कोरोना योद्धांच्या गौरव समारंभाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सहायक जिल्हा नियोजन अधिकारी वसुंधरा फाळके, माविंमचे सहायक जिल्हा समन्वय अधिकारी विष्णुपंत झाडे, लेखाधिकारी मुकुंद देशकर, भावना डोंगरे यावेळी उपस्थित होते. यावेळी सहायक जिल्हा नियोजन अधिकारी वसुंधरा फाळके यांच्या हस्ते कोरोना काळात आपला जीव धोक्यात घालून वाटसरूंची भूक भागवलेल्या भंडारा येथील नवप्रभा लोकसंचालित साधन केंद्राच्या व्यवस्थापक रंजना खोब्रागडे, क्षेत्र समन्वयक मनोज केवट, लेखपाल रोशन साकुरे, सहयोगीनी अरुणा बांते, शोभा आंबुने यांचा प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी समाजाच्या विकासासाठी महिला बचत गटांसोबतच नवप्रभा लोकसंचालित साधन केंद्राने समाजाप्रती जपलेली ईतक्या वर्षाची बांधिलकी आणि कोरोना संसर्गाची भीती असताना स्वतःला झोकून देऊन केलेल्या कामाचा हा खरा गौरव असल्याचे गौरवोद्गार सहायक जिल्हा नियोजन अधिकारी वसुंधरा फाळके यांनी केले. क्षेत्रीय समन्वयक मनोज केवट यांनी आपले कोरोना संसर्गाच्या काळात मनातील असलेली भीती एकीकडे तर दुसरीकडे आपल्या कर्तव्याची सांगड घालत असताना आलेल्या अनुभव कथन केले. व्यवस्थापक रंजना खोब्रागडे यांनी आपल्या टीमसोबत काम करताना तसेच शिवभोजन थाळीतून अनेकांना मदत करता आली. तसेच महिलांसाठी केलेल्या कार्याचा आढावाही यावेळी घेतला. यावेळी कार्यक्रमासाठी श्यामराव बोंद्रे, सुरेंद्र पिसे, महेंद्र गिलोरकर यांचे सहकार्य लाभले.
लॉकडाॅऊन कालखंडातील खऱ्या कोरोना योद्धांचा होतोय गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 4:34 AM