कोढा ग्रामपंचायत कार्यालयात महिला दिनाचा कार्यक्रम सोमवारी आयोजित करण्यात आला होता. सरपंच डॉ. नूतन विलास कुर्झेकर यांच्या पुढाकारात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी एकदिवसीय सरपंच होण्याचा मान अश्विनी धनराज जिभकाटे यांना दिला. यावेळी बारावीत प्रथम येणारी स्तेजल नारद बोरकर, दहावीत प्रथम येणारी प्रतीक्षा धनपाल जिभकाटे आणि एकदिवसीय सरपंच अश्विनी धनराज जिभकाटे यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला अंगणवाडी सेविका आशा लेदे, सरिता टेंभुर्णे, त्रिवेणी माकडे, विमल कावळे, भागिरथा टेंभुर्णे, आशा सेविका वर्षा जांभूळकर, दिव्या मेश्राम, अंजू सेलोकर, मुख्याध्यापिका पडोळे, ग्रामपंचायत सदस्य रुखमा मोहरकर, बिबुला टेंभुर्णे, बबिता माकडे, चुडामन वैद्य, संजय कुर्झेकर उपस्थित होते. सूत्रसंचालन संगणक परिचारिका रजनी प्रकाश कुर्झेकर यांनी, तर आभार सरपंच डॉ. नूतन कुर्झेकर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अरुण कुर्झेकर, लीलाधर जिभकाटे, राजू देशमुख, मनोहर जिभकाटे यांनी सहकार्य केले.
सुवर्ण पदक विजेती अश्विनी झाली एक दिवसाची सरपंच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 4:35 AM