शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्रिपदावर आज दिल्लीत निर्णय; फडणवीसांना पसंती, मात्र समर्थकांना धक्कातंत्राची भीती
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस लाभदायी, धनलाभ संभवतो!
3
जम्मू-काश्मिरच्या खोऱ्यात दहशतवाद्यांचा खात्मा होणार; NSG कमांडो कायमस्वरूपी तैनात करण्यास गृह मंत्रालयाची मंजुरी
4
VI नंबर १, सन्मान कॅपिटल २, इंडियन ऑईल ३... ही अशी कोणती लिस्ट, ज्यात कोणालाही नकोय नाव?
5
शेअर बाजारातून चांगला रिटर्न मिळवण्याच्या मोहात गमावले ११ कोटी; अधिकाऱ्यासोबत काय घडले?
6
कोण होणार मुख्यमंत्री? विनोद तावडेंनी घेतली अमित शाहांची भेट; 40 मिनिटं चर्चा
7
सत्ता भल्याभल्यांना मोहात पाडते, पण...; श्रीकांत शिंदेंची वडील एकनाथ शिंदेंबाबत भावुक पोस्ट
8
डिसेंबरमध्ये भाजपाच्या नवीन अध्यक्षांची निवड; निरीक्षकांच्या केल्या नेमणुका
9
शिंदे म्हणतात, ‘लढाई’ जिंकली, पण ‘युद्ध’ बाकी; २५ तारखेच्या दिल्लीतील बैठकीत काय घडलं?
10
मविआला पहिला धक्का?; मुंबई महापालिका स्वबळावर लढण्याची उद्धवसेनेची इच्छा
11
सोनिया, राहुल, प्रियांका - संसदेत तिहेरी तोफ; संसदीय इतिहासात पहिल्यांदाच एकत्र
12
डोंगरीत बहुमजली इमारतीला भीषण आग; पाच जखमी; ४० रहिवाशांची सुखरूप सुटका
13
कुजबुज: मोदी-शाहांचे आभार मात्र फडणवीसांचं नावही घेतलं नाही, शिंदेंची नाराजी का?
14
मुंबईतील दुर्दैवी घटना! डंपरच्या धडकेत मायलेकाचा मृत्यू; शाळेत जाताना काळाचा घाला
15
राज्याला भरली हुडहुडी! मुंबईसह उत्तर महाराष्ट्राला थंडीच्या लाटेचा इशारा
16
मानसिक छळाला कंटाळून एअर इंडियाच्या महिला पायलटनं उचललं टोकाचं पाऊल, मित्राला अटक
17
विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर स्वबळाची भाषा सुरू; मविआ फुटीच्या उंबरठ्यावर?
18
महापालिका निवडणुकीत पक्षाचे अस्तित्व टिकवण्याचे उद्धव ठाकरेंसमोर कडवे आव्हान
19
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
20
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान

सोन्याचा दर ३३ हजार; विक्री बेभाव

By admin | Published: November 11, 2016 12:42 AM

मंगळवारी रात्री ५०० व १००० रूपयांच्या नोटा रद्दची घोषणा होताच भंडारा व तुमसर शहरात बुधवार व

पैसा निघाला बाहेर : भंडारा, तुमसरसह जिल्ह्यात विक्रमी सोने खरेदी ?तुमसर/भंडारा : मंगळवारी रात्री ५०० व १००० रूपयांच्या नोटा रद्दची घोषणा होताच भंडारा व तुमसर शहरात बुधवार व गुरूवारला सोने खरेदीसाठी ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. रात्री १२ वाजतापर्यंत या नोटा वैध असल्यामुळे सोन्याचा दर ३० हजारावरून सरळ ३५ हजारावर पोहोचला. गुरूवारला रात्री सराफा व्यापाऱ्यांना सोन्याचा दर ३३ हजार रूपये असल्याचा संदेश आला आहे. असे असतानाही व्यापारी ग्राहकांकडून अधिकचा दर वसूल करीत आहेत.गुरूवारला हा दर ३८ ते ४० हजाराच्यावर पोहोचला होता. परंतु पाचशे रूपयांच्या नोटा घेण्यासाठी दुकानदारांनी नकार दिल्यामुळे अनेकांना परतावे लागले. जिल्ह्यात सर्वाधिक सराफा दुकाने तुमसर शहरात आहेत. त्यामुळे या शहरात अतिरिक्त पैसा होता का? या चर्चांना पेव फुटले आहे.तुमसर शहराला कुबेरनगरी असे संबोधले जाते. मंगळवारी रात्री ८ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५०० व १००० रूपयांच्या नोटा रात्री १२ नंतर चलनातून बंद होण्याची घोषणा केल्यानंतर सर्वत्र एकच खळबळ उडाली. एकीकडे सर्वसामान्य नागरिकांकरिता माहिती देणे सुरू होते तर दुसरीकडे एका वर्गात प्रचंड अस्वस्थता पसरली होती. यातून मार्ग काढण्याकरिता काहींनी सराफा दुकानदारांशी संपर्क साधून सोने खरेदी केले. सोने कमी व रक्कम जास्त अशी स्थिती निर्माण झाली होती. हिशोबाचे सोने विक्री करताना सराफा दुकानदारांची तारांबळ उडाली. त्यामुळे सोन्याचा दर एका तासात येथे ३५ ते ४० हजाराच्यावर पोहोचला. सोने खरेदी करताना काही सराफा दुकानदार वगळता पक्के बिल येथे कुणी देत नाही. त्यामुळे अतिरिक्त पैसा सोन्यात गुंतविला आहे. मध्यरात्रीपर्यंत हा व्यवहार सुरू होता. येथून दोन ते अडीच तासात मध्यप्रदेश तथा छत्तीसगड येथे जाता येते. त्यामुळे सोने विक्रेते येथे सक्रीय झाले होते. बिल न दिलेल्या सोन्याचे दर चांगलेच वधारले होते. सोने विक्रीसाठी कठोर नियम असतानाही सोने खरेदी कशी केली? हे अनुत्तरीत आहे. (तालुका प्रतिनिधी)