मोहन भोयर।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : मुंबई - हावडा रेल्वे मार्गावर वैनगंगा नदी पुलावरील तिसºया रेल्वे ट्रॅककरिता माडगी (दे) शिवारात पुलाचे बांधकाम सुरू आहे. नदीपात्रात पिल्लरच्या बांधकामाकरिता मोठ्या प्रमाणात रेतीची गरज आहे. नदीघाट लिलाव नसताना बांधकामाकरिता रेती कुठून आणली जात आहे. येथे नदी पात्रातील तथा इतर ठिकाणाहून येथे रेती आणली जात असल्याची माहिती आहे. महसूल विभागाचे येथे दुर्लक्ष दिसत आहे. रॉयल्टीविना रेतीचा वापर येथे होत असल्याचे समजते.मुंबई-हावडा मार्गावर तिसºया रेल्वे ट्रॅकचे काम जोमाने सुरु आहे. नागपूर विभागात माडगी शिवारातील वैनगंगा नदीपात्रातील क्रमांक दोनचा मोठा पुलाचे बांधकाम सध्या सुरु आहे. सहा महिन्यापूर्वी येथे पुल बांधकामाला सुरुवात झाली. येथे विस्तीर्ण नदीपात्र आहे. पुलाच्या पिल्लरचे बांधकाम येथे सुरु आहे. सिमेंट काँक्रीटच्या पिल्लरकरिता मोठ्या प्रमाणात रेतीचा वापर करणे सुरु आहे. माडगी शिवारात तथा जवळपास रेती घाटांचा लिलाव झाला नाही. मात्र दररोज पिल्लर बांधकामाकरिता रेतीचा उपयोग मात्र सुरु आहे. ही रेती कुठून आणली जाते हे अद्याप गुलदस्त्यात आहे. नदीपात्रातील बांधकाम सहसा रात्री सुरु राहते. अशी माहिती आहे. सुरुवातीला नदीपात्रातीलच रेतीचा उपयोग येथे केला जात होता. त्यानंतर तक्रारीची कुणकुण लागताच दुसºया स्थळावरून ट्रॅक्टरने रेती येथे आणली जात आहे. हा केवळ देखावा आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात रेती ट्रॅक्टरने आणली जाऊ शकत नाही. नदीपात्रातील रेतीचा वापर केला जात असल्याची माहिती आहे. रेल्वे अधिकाºयांचा येथे प्रत्यक्ष संबंध व नियंत्रण नाही. केवळ बांधकामावर त्यांची देखरेख आहे. याप्रकरणी रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी सांगायला तयार नाही. हा सर्व गौडबंगाल मागील सहा महिन्यापासून सुरु आहे. तालुका महसूल विभागाचे दुर्लक्ष होत आहे. रेल्वेचे काम केंद्राच्या अखत्यारीत येते असा त्यांचा समज आहे. परंतु रेतीचा संबंध निश्चितच महसुलाशी येतो. येथे राज्य शासनाचा महसूल बुडत आहे. याकडे लक्ष देण्याची व चौकशी करण्याची गरज आहे.
तिसऱ्या रेल्वे पूल बांधकामावर रेतीचे गौडबंगाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 11:05 PM
मुंबई - हावडा रेल्वे मार्गावर वैनगंगा नदी पुलावरील तिसºया रेल्वे ट्रॅककरिता माडगी (दे) शिवारात पुलाचे बांधकाम सुरू आहे. नदीपात्रात पिल्लरच्या बांधकामाकरिता मोठ्या प्रमाणात रेतीची गरज आहे. नदीघाट लिलाव नसताना बांधकामाकरिता रेती कुठून आणली जात आहे.
ठळक मुद्देमुंबई-हावडा रेल्वे मार्गावरील बांधकाम : नदीपात्रातील रेतीचा वापराची शक्यता