फेब्रुवारी
शेतकऱ्यांची बँक असलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेला शंभर वर्ष पूर्ण झाल्याद्दल शतकोत्तर वाटचाल हा पुरस्कार प्राप्त झाला. तर भंडारा रेडक्रॉस सोसायटीला राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा महाराजसिंह ट्रॉफी हा पुरस्कार मिळाला. लाखनी येथे एका स्कूल बस चालकाने चक्क शिक्षिकेच अपहरण केल्याची घटना घडली. तर कर्तव्यावर असलेल्या वाहतूक शिपायाला गडेगाव येथे एका ट्रकने चिरडून ठार केले.
मार्च
कोरोना महामारीच्या संकटाची चाहूल या महिन्याने दिली. महिन्याच्या सुरूवातीला कोरोनाबाबत अफवा पसरविणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. साकोली येथे शासकीय कृषी महाविद्यालयाची घोषणा करण्यात आली. कोरोनामुळे आंतरराज्यीय एसटी बस सेवा बंद करण्यात आली. अड्याळ येथील प्रसिद्ध घोडायात्रा रद्द करण्याची वेळ कोरोनाने आणली. २२ मार्च रोजी पहिला जनताकर्फ्यु कडकडीत पाडण्यात आला आणि दुसऱ्या दिवसापासून लॉकडाऊनला सुरूवात झाली. प्रशासनाने जिल्ह्यात नऊ ठिकाणी सेल्टर होमची सुरूवात केली.
एप्रिल
सर्वत्र कोरोनाने जनता भयभीत झाल्याचे या महिन्यात दिसून आले. भंडारा जिल्ह्यातील पहिल्या कोरोना रुग्णाची नोंद २७ एप्रिल रोजी घेण्यात आली. बँकेचे हप्ते थांबविण्यासाठी कोरोना झाल्याच्या बणाव करणाऱ्या एका इसमाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ८ मार्चपासून सर्वांसाठी मास्क अनिवार्यचा निर्णय याच महिन्यात घेण्यात आला. कोरोना प्रभाव रोखण्यासाठी सर्वांनी आपल्या घरचे दिवे विझवून मेनबत्त्या आणि दिवे लावून या महिन्यात कोरोना व्हारियरचे स्वागत केले. भंडारा येथे दूध भुक्टी प्रकल्पाला प्रारंभ झाला. तर आयुध निर्माणीने दोन हजार लीटर हॅन्ड सॅनिटायझरची निर्मीती केली.
मे
या महिन्यात कडक लॉकडाऊनचा अनुभव नागरिकांनी घेतला. अशा काळात उपासमार होवू नये म्हणून शासनाने रोजगार हमीची कामे सुरू केली. ५० हजार नागरिकांना रोजगार देण्यात आला. या महिन्यात अवकाळी पावसानेही झोडपून काढले. तुमसर तालुक्यातील बोरी येथे वीज कोसळून एकाचा मृत्यू झाला तर तुमसर आणि मोहाडी तालुक्याला कारपीटीने तडाखा दिला.
जून
जिल्ह्यात टोळधाडीचे आगमन झाले. तुमसर, भंडारा, मोहाडी तालुक्यात ही टोळधाड शेतीपिकांचे नुकसार करून गेली. खरबी येथे उभारलेल्या कोविड चेकपोस्टमध्ये एक भरधाव कार शिरल्याने पोलीस उपनिरीक्षक आणि एक शिपाई गंभीर जखमी झाला. तर पवनी येथे एका २६ दिवसाच्या चिमुकलीला आईनेच पाण्याच्या टाक्यात बुडवून ठार मारले. इंधन दरवाढीच्या विरोधात काँग्रेसचे आंदोलनही चांगलेच गाजले.
जुलै
भंडारा शहरातील राष्ट्रीय महामार्गावर एटीएम फाेडून चोरट्याने नऊ लाख ४१ हजार रुपये लंपास केल्याने संपूर्ण जिल्हा हादरून गेला होता. या पाठोपाठ साकोली तालुक्यातील पिंडकेपार येथे बिबट्याची शिकार झाल्याचे उघडकीस आले. जुलै महिन्यात कोरोनाची दहशतही कायम होती. शासकीय कार्यालयांनाही या महिन्यात कोरोनाचा विळखा पडायला सुरूवात झाली. जिल्हा परिषदेमध्ये कर्मचारी पॉझिटिव्ह आढळल्याने पाच दिवस जिल्हा परिषदेचे कामकाज बंद ठेवण्यात आले होते. तुमसर तालुक्यातील राजापूर येथे चौघांची नग्न धिंड काढून माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली. याप्रकरणात २४ जणांना अटक करण्यात आली.
ऑगस्ट
मोहाडी येथील कापड व्यवसायीकाचा मुलगा हेमंत नंदनवार हा युपीएससीची परीक्षा उत्तीर्ण होवून आएएस झाला. जिल्ह्र्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला. अयोद्धेत राम मंदिराचा शिल्यान्यास होण्याप्रित्यर्थ पवनी येथील वैजेश्वर घाटावर पाच हजार एक दिवे प्रवाहीत करण्यात आले. खऱ्या अर्थाने ऑगस्ट महिना गाजला तो महापुराने भंडारा शहरासह संपूर्ण जिल्ह्याला महापुराचा तडाखा बसला. पाच दिवस महापुराची धग कायम होती. महापुरात चौघांचा मृत्यूही झाला.
सप्टेंबर
कोरोना काळात बाहेरगावी जाण्यासाठी शासनाने लागूू केलेली ईपासची अट या महिन्यात रद्द करण्यात आल्याने मोठा दिलासा मिळाला. महापुरामुळे भंडारा शहरातील पाणीपुरवठा १५ दिवस ठप्प पडला होता. महापुराची पाहणी करण्यासाठी केंद्राची पहिली चमू जिल्ह्यात दाखल झाली होती. गावोगाव सर्व्हेक्षण करण्यासाठी आरोग्य विभागाने ८६१ चमू तयार केल्या होत्या. याच महिन्यात लाखांदूर तालुक्यातील कन्हळगावला स्वच्छ सुंदर शौचालय स्पर्धेत देशपातळीवरील दुसरा पुरस्कार मिळाला.
ऑक्टोबर
कोरोना संकटाची धग याही महिन्यात कायम होती. त्यातच एका कोरोनाबाधिताचा मृतदेह जिल्हा रुग्णालयाबाहेर मिळाल्याने एकच खळबळ उडाली. आरोग्यविभागाच्यावतीने कारोना संदर्भात जिल्ह्यातील पाच लाख नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. या काळात धानावर कीडींचा प्रादूर्भाव वाढला. शेतकरी हतबल झाल्याचे दिसत होते. एकीकडे कोरोनाचे संकट आणि दुसरीकडे निसर्गाचा प्रकोप अशी अवस्था होती.
नोव्हेंबर
दिवाळीसारखा सण अगदी साधेपणात साजरे करण्याची वेळ या काळात आली. कोरोनाचे संकट कायम असताना पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीची धामधूम दिसत होती. ३० नोव्हेंबर रोजी या निवडणुकीसाठी मतदान झाले. रेती तस्करीने करचखेडा येथे एका गर्भवती महिलेचा बळी याच महिन्यात घेतला. तर अनैतीक संबंध बघितल्याने सहा वर्षीय बालकाची हत्या करण्याची घटना मोहाडी तालुक्याच्या सालेबर्डीत घडली.
डिसेंबर
दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ भंडारा येेथे रास्ता रोको करण्यात आला. साकोली तालुक्यातील सानगडी येथील स्टेट बँकेत ७५ लाख रुपयांचा धाडसी दरोडा पडला. अडीच तोळे सोन्यासाठी तीन मित्रांनी एका मित्राचा कोका जंगलात खून करण्यात आला. तर अनैतीक संबंधात अडसर ठरू पाहणाऱ्या पतीचा पत्नीने प्रियकराच्या मदतीने खून केला. वैनगंगा नदीत आढळलेल्या मृतदेहाचे रहस्य पोलिसांनी उलगडले. महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच ग्रामपंचायत निवडणुकीची घोषणा झाली. आणि ग्रामीण राजकारण तापायला लागले.