आॅनलाईन लोकमतभंडारा : गोपाळ समाज हा भटक्या विमुक्त जातीतील असून तो नेहमी गावोगावी प्रवास करीत असतो. एकाच ठिकाणी त्याचे वास्तव्य नसते. त्यामुळे त्यांच्या जीवनात स्थैर्य नाही. गरीबी व शिक्षणाचा अभाव या समाजात आहे. खैरलांजीमध्ये या समाजाला राहण्यासाठी जागा मिळाल्यामुळे हा समाज स्थायी झाला. परंतु अशिक्षितांचे प्रमाण जास्त आहे. मागासलेपण दूर करण्यासाठी शिक्षणाशिवाय पर्याय नाही, असे प्रतिपादन महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी केले.साकोली तालुक्यातील खैरलांजी येथील गोपाळ समाजाच्या वस्तीला भेट दिली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी साकोलीच्या नगराध्यक्षा धनवंता राऊत, उपविभागीय अधिकारी अर्चना मोरे, माजी आमदार डॉ.हेमकृष्ण कापगते उपस्थित होते.यावेळी हरिभाऊ बागडे यांनी गोपाळ समाज बांधवांशी संवाद साधला. त्यावेळी आम्हाला घराचे आणि शेतजमिनीचे पट्टे मिळवून देण्यात यावे, गॅस सिलेंडर आम्हाला मिळाले नाही याबाबत मागणी केली. याची उपविभागीय अधिकाºयांनी दखल घेऊन कार्यवाही करून त्यांना लाभ द्यावा, असे सांगितले.
गोपाळ समाजाला शिक्षणाशिवाय पर्याय नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2018 10:20 PM
गोपाळ समाज हा भटक्या विमुक्त जातीतील असून तो नेहमी गावोगावी प्रवास करीत असतो. एकाच ठिकाणी त्याचे वास्तव्य नसते.
ठळक मुद्देविधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे : खैरलांजी येथील गोपाळ वस्तीला भेट