सानगडी : गोसे खुर्द प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रातील कुटुंबांना नोकरीऐवजी एकमुस्त रक्कम देण्याचे शासनाचे निर्णय असताना अनेक कुटुंबांना याबाबतचा लाभ देण्यात आलेला नाही. प्रकल्पग्रस्त कुटुंब त्याच गावचे मूळ रहिवासी आहेत त्यांची नावे बाधित कुटुंबांच्या यादीत तसेच घर मालमत्तेवरसुद्धा आहेत. याशिवाय अनेकांची नावे मंजूर झालेल्या अवाॅर्डमध्ये आहे. तरीही त्यांना वंचित ठेवण्यात आले आहे. प्रकल्पबाधित कुटुंब एकमुस्त रक्कम मिळण्यापासून वंचित राहू नये यासाठी शासन निर्णयाची योग्य अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. उल्लेखनीय म्हणजे अनावश्यक अटी रद्द करून त्यानुसार अपात्र केलेली प्रकरणे पुन्हा तपासून प्रकल्पबाधित लाभार्थ्यांना नोकरीऐवजी एकमुस्त रकमेचा लाभ शासन निर्णयानुसार त्वरित देण्यात यावा, अशी जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्तांची मागणी आहे. यासंदर्भात ३ सप्टेंबर रोजी विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आली आहे. या बैठकीत काय निर्णय घेतला जातो, अशीही चर्चा आहे.
गोसे खुर्द प्रकल्पबाधित कुटुंब एकमुस्त लाभापासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2021 5:15 AM