शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्रिपदावर आज दिल्लीत निर्णय; फडणवीसांना पसंती मात्र ऐनवेळी भाजपा धक्का देणार?
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस लाभदायी, धनलाभ संभवतो!
3
कोण होणार मुख्यमंत्री? विनोद तावडेंनी घेतली अमित शाहांची भेट; 40 मिनिटं चर्चा
4
सत्ता भल्याभल्यांना मोहात पाडते, पण...; श्रीकांत शिंदेंची वडील एकनाथ शिंदेंबाबत भावुक पोस्ट
5
डिसेंबरमध्ये भाजपाच्या नवीन अध्यक्षांची निवड; निरीक्षकांच्या केल्या नेमणुका
6
शिंदे म्हणतात, ‘लढाई’ जिंकली, पण ‘युद्ध’ बाकी; २५ तारखेच्या दिल्लीतील बैठकीत काय घडलं?
7
मविआला पहिला धक्का?; मुंबई महापालिका स्वबळावर लढण्याची उद्धवसेनेची इच्छा
8
सोनिया, राहुल, प्रियांका - संसदेत तिहेरी तोफ; संसदीय इतिहासात पहिल्यांदाच एकत्र
9
डोंगरीत बहुमजली इमारतीला भीषण आग; पाच जखमी; ४० रहिवाशांची सुखरूप सुटका
10
कुजबुज: मोदी-शाहांचे आभार मात्र फडणवीसांचं नावही घेतलं नाही, शिंदेंची नाराजी का?
11
मुंबईतील दुर्दैवी घटना! डंपरच्या धडकेत मायलेकाचा मृत्यू; शाळेत जाताना काळाचा घाला
12
राज्याला भरली हुडहुडी! मुंबईसह उत्तर महाराष्ट्राला थंडीच्या लाटेचा इशारा
13
मानसिक छळाला कंटाळून एअर इंडियाच्या महिला पायलटनं उचललं टोकाचं पाऊल, मित्राला अटक
14
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
15
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
16
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
17
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
18
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
19
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
20
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला

‘गोसेखुर्द’प्रकल्प झाला ६२,२६३ हेक्टर सिंचनक्षम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 02, 2017 11:20 PM

राज्यातील एकमेव राष्ट्रीय प्रकल्प असलेल्या पूर्व विदर्भातील महत्त्वाकांक्षी गोसेखुर्द प्रकल्पातून जून २०१७ अखेर ६२ हजार २६३ हेक्टर सिंचनक्षमता निर्माण झाले आहे.

ठळक मुद्दे२०१९ पर्यंत प्रकल्प पूर्ण होणार ! : १३,८९३ हेक्टर लाभक्षेत्रातील कामे पूर्ण

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : राज्यातील एकमेव राष्ट्रीय प्रकल्प असलेल्या पूर्व विदर्भातील महत्त्वाकांक्षी गोसेखुर्द प्रकल्पातून जून २०१७ अखेर ६२ हजार २६३ हेक्टर सिंचनक्षमता निर्माण झाले आहे. डिसेंबर २०१९ अखेर १ लाख ८८ हजार ५३७ हेक्टर सिंचन क्षमता निर्मितीचे नियोजन असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वत: या प्रकल्पावर लक्ष ठेऊन आहेत. या प्रकल्पांतर्गत १.९० लाख हेक्टर सिंचनक्षेत्र प्रस्तावित असून त्यापैकी १३,८९३ हेक्टर लाभ क्षेत्रात विकासकामे झाली आहे. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समाविष्ट या प्रकल्पाला केंद्रीय जल आयोगाने नाबार्डमार्फत ७५० कोटी रूपयांचा निधी दिला आहे. केंद्र सरकारकडून ९० टक्के अर्थसहाय्य मिळत आहे.या प्रकल्पामुळे पूर्व विदर्भातील भंडारा, नागपूर व चंद्रपूर जिल्ह्यात पिण्यासाठी पाणीपुरवठा, औद्योगिक पाणीपुरवठा, मत्स्यव्यवसाय, जलविद्युत निर्मिती होणार आहे. यामुळे १ लाख ९० हजार हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ होणार असून त्यापासून २ लाख ५० हजार ८०० हेक्टर इतकी सिंचन क्षमता निर्माण होणार आहे. राज्य शासनाने या प्रकल्पाच्या १८,४९४.५७ कोटींच्या प्रस्तावाला तृतीय सुधारित प्रशासकीय मान्यता दिली आहे.गोसेखुर्द प्रकल्पाच्या मुख्य धरणाचे काम पूर्ण झाले असून या प्रकल्पामध्ये ६२० दशलक्ष घनमीटर जलसाठा आहे. या प्रकल्पातून ६२ हजार २६३ हेक्टर क्षेत्राला सिंचनाची सुविधा झाली असून या प्रकल्पाच्या पाणीवितरीकेचे काम पूर्ण झाल्यानंतर २ लाख ५० हजार ८०० हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ होणार आहे. त्यासाठी २०१९-२० पर्यंतचे नियोजन करण्यात आले आहे. प्रकल्पाअंतर्गत मुख्य धरणासह चार उपसा सिंचन योजना, उजवा कालवा, डावा कालवा, असोलामेंढा प्रकल्प व इतर छोटया पाच उपसा सिंचन योजनेचा समावेश आहे. या प्रकल्पामधून उजवा कालवा ९९ किलोमीटरचा असून भंडारा व चंद्रपूर या जिल्ह्यातील ७१ हजार ८१० हेक्टर क्षेत्राचे सिंचन होणार असून त्यापैकी १३ हजार ९२६ हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा प्रत्यक्ष लाभ मिळत आहे.डावा कालवा हा २३ किलोमीटरचा असून यामधून ३१ हजार ५७७ हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होणार असून त्यापैकी १० हजार ६८३ हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळत आहे. उजवा कालव्याच्या पुढे आसोलामेंढा प्रकल्प व मुख्य कालव्यापर्यंत राहणार असून त्याची लांबी ४३ किलोमीटरची आहे. यामधून १२ हजार ३५६ हेक्टर क्षेत्राला सिंचनाचे पाणी उपलब्ध झाले आहे.१२,८३५.४८ कोटींचा खर्च वाढलाएकूण प्रकल्प किंमतीतील वाढ १२,८३५.४८ कोटी रूपयांची आहे. त्यात निव्वळ दरवाढीमुळे ३,५४४.९५ कोटी, भूसंपादन दरातील वाढीमुळे १,९७३.७९ कोटी, संकल्प चित्रातील बदल १,६४६.७२ कोटी, द्वितीय सुधारीत प्रशासकीय मान्यतेनंतर झालेल्या अतिरिक्त भौतिक प्रकल्प घटकांमुळे झालेली वाढ ३,०६७.०२ कोटी, पुनर्वसन पॅकेज, एनपीव्ही आदी कारणांमुळे १,४९०.५८ कोटी आणि आस्थापना व अनुषंगिक खर्चासाठी ८६४.६३ कोटी, मागील काळात दिलेल्या जादा दराच्या निविदा आदी असा एकूण १२,८३५.४८ कोटी खर्च वाढला आहे.