बॉक्स
अडीच लाख हेक्टर सिंचन क्षमता
गोसेखुर्द हा पूर्व विदर्भातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. १८ हजार ४९५ कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पामुळे नागपूर, भंडारा व चंद्रपूर जिल्ह्याला सिचंनासाठी मोठा लाभ होणार आहे. या प्रकल्पाची सिंचन क्षमता २ लाख ५० हजार ८०० हेक्टर आहे. प्रकल्पात एकूण जलसाठा ११४६ दलघमी राहणार आहे. त्यापैकी ७४० दलघमी उपयुक्त जलसाठा आहे. धरणाचे काम शंभर टक्के पूर्ण झाले आहे. कालवे व वितरिकांच्या माध्यमातून प्रवाही सिंचन ६३ टक्के पूर्ण झाले आहे. उपसा सिंचनाद्वारे ३७ टक्के सिंचन होत आहे. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकल्पाला भेट दिल्याने उर्वरित कामाला गती येईल आणि हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने सिंचनासाठी उपलब्ध होईल, अशी आशा आहे.