लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : पूर्व विदर्भात मागील दोन दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे विदर्भातील महत्त्वाकांक्षी गोसेखुर्द धरणाचा जलस्तर वाढला आहे. परिणामी या धरणाचे ३३ पैकी ९ दरवाजे आज शनिवारला अर्धा मीटरने उघडण्यात आले आहे. शनिवारला सकाळी पहिले पाच दरवाजातून ५१८ क्युमेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे.तथापि, धरणात येणाऱ्या पाण्याचा प्रवाह अधिक असल्यामुळे धरण विभागाने दुपारी तीन वाजता ९ दरवाजे अर्धा-अर्धा मीटरने उघडले आहे. त्यातून ९३७ क्युमेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरण विभागाकडून आता २४२ मीटरवर जलस्तर स्थिर ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यात साकारलेल्या राष्ट्रीय गोसेखुर्द सिंचन प्रकल्पाच्या धरणाचा जलस्तर संततधार पावसामुळे शुक्रवारला सायंकाळपासून वाढत आहेत. धरण विभागाच्या सुत्रानुसार, या पावसामुळे बुडीत क्षेत्रातील कोणत्याही गावांना धोका नाही. त्यामुळे आज सकाळी १० वाजता धरणाच्या ३३ पैकी पाच दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात आले. तीन वाजता ९ दरवाजातून अर्धा मीटरने उघडण्यात आले. या ९ दरवाजातून ९३७ क्युमेक्स पाण्याचा विसर्ग होत आहे. या धरणाच्या खाली असलेल्या वैनगंगा नदीच्या पात्रात हे पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे या पाण्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील नद्या तुडूंब भरून वाहत आहे.
गोसेखुर्दचे नऊ दरवाजे अर्धा मीटर उघडले
By ऑनलाइन लोकमत | Published: July 07, 2018 10:29 PM
पूर्व विदर्भात मागील दोन दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे विदर्भातील महत्त्वाकांक्षी गोसेखुर्द धरणाचा जलस्तर वाढला आहे. परिणामी या धरणाचे ३३ पैकी ९ दरवाजे आज शनिवारला अर्धा मीटरने उघडण्यात आले आहे. शनिवारला सकाळी पहिले पाच दरवाजातून ५१८ क्युमेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
ठळक मुद्देपाण्याच्या पातळीत वाढ : धरणाची पातळी २४२ मीटरवर स्थिर