लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यातील राष्ट्रीय प्रकल्प घोषित झालेला गोसेखुर्द प्रकल्प हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वॉर रूममध्ये समाविष्ट आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी हा प्रकल्प लवकरात लवकर व्हावा, यासाठी या प्रकल्पामध्ये येणाºया अडचणी दूर करून प्रकल्प मार्गी लावण्याच्या सूचना अधिकाºयांना दिलेल्या आहेत.त्यानुसार भंडारा जिल्ह्यातील पिंडकेपार टोली व खापरी रेहपाडे या गावठाणाची भुसंपादन प्रक्रिया भुसंपादन कायदा २०१३ अंतर्गत सुरू असल्यामुळे ही भुसंपादन प्रक्रिया शीघ्रगतीने पुर्ण व्हावे, याकरिता थेट खरेदी पद्धतीने भुसंपादन करण्याची तरतुदीची मंजुरी शासनाकडून मिळावी यासाठी विधान परिषद सदस्य डॉ.परिणय फुके यांनी २५ आॅक्टोबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून निवेदन सादर केले होते. त्यावेळी भूसंपादनाकरीता थेट खरेदी पद्धतीला परवागनी द्यावी, अशी विनंती केली होती.यासंदर्भात जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्याशी गोसेखुर्द प्रकल्पासंदर्भात जिल्हाधिकाºयांच्या कक्षात आढावा बैठक घेतली. या बैठकीत गावठाण भूसंपादनासाठी थेट खरेदी पद्धतीला शासनाकडून मंजुरी मिळाली असल्याचे जिल्हाधिकाºयांनी आ.परिणय फुके यांना सांगितले. यासंदर्भात शासनाकडून तातडीने निर्णय घेतल्यामुळे खापरी रेहपाडे येथील ३६७ खातेदार पिंडकेपार येथील ७१ खातेदार व भोजापूर येथील १३५ खातेदार यांना गावठाणातील थेट जमीन खरेदीचा फायदा होणार आहे. थेट भुसंपादनाबाबत शासनाकडे पाठपुरावा करून मंजुरी मिळवून दिल्याबद्दल सरपंच व गावकºयांनी आ.परिणय फुके व जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांचे आभार मानले.बैठकीला उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) भाकरे, जिल्हा पुनर्वसन अधिकारी मनिषा दांडगे, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेंद्र मेश्राम, गोसेखुर्द पुनर्वसन विभागाचे कार्यकारी अभियंता बुराडे, अधीक्षक अभियंता गोसेखुर्द नार्वेकर, भंडाराचे नगराध्यक्ष सुनिल मेंढे, जिल्हा परिषद सदस्य अरविंद भालाधरे, पिंडकेपारचे माजी सरपंच बबलू आतीलकर उपस्थित होते.
गावठाण भूसंपादनासाठी थेट खरेदी पद्धतीला शासनाची मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 09, 2017 9:59 PM
जिल्ह्यातील राष्ट्रीय प्रकल्प घोषित झालेला गोसेखुर्द प्रकल्प हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वॉर रूममध्ये समाविष्ट आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी हा प्रकल्प लवकरात लवकर व्हावा,
ठळक मुद्देजिल्हाधिकाºयांच्या कक्षात चर्चा : परिणय फुके यांच्या प्रयत्नाला यश