जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य ध्वजारोहण समारंभात ते बोलत होते. यावेळी खा. सुनील मेंढे, आ. नरेंद्र भोंडेकर, जिल्हाधिकारी संदीप कदम, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मून, जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव, उपवनसंरक्षक एस. बी. भलावी, अप्पर जिल्हाधिकारी घनश्याम भूगावकर, अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती, निवासी उपजिल्हाधिकारी शिवराज पडोळे उपस्थित होते. शेतकरी हा महाविकास आघाडी सरकारचा केंद्रबिंदू असून शेतकरी कर्जमुक्त करण्याचा सरकारचा संकल्प आहे.
महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेत जिल्ह्यातील ३५ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात १५० कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत, असे पालकमंत्री म्हणाले. यंदाच्या खरीप हंगामात आधारभूत धान खरेदी योजनेंतर्गत १४ लाख ८५ हजार क्विंटल धानाची खरेदी केली असून ४९ हजार ६१० शेतकऱ्यांनी सदर योजनेचा लाभ घेतला आहे. कृषीपंप योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ७ हजार ४८९ कृषिपंपांना वीजजोडणी देण्यात आली आहे. जिल्ह्याच्या विकासात महत्त्वाचे योगदान असलेल्या गोसीखुर्द प्रकल्पासाठी आवश्यक निधी देवून हा प्रकल्प २०२३ पर्यंत पूर्ण करण्याचा शासनाचा निर्धार आहे, असे ते म्हणाले.
कोरोनामुक्तीचे प्रमाण ९६ टक्क्यांवर आले आहे. कोरोनाचे संकट कमी झाले असले तरी धोका मात्र टळला नाही. जिल्ह्यात कोविड लसीकरणाला सुरुवात झाली असली तरी काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. मास्क वापरणे, नियमित हात धुणे व सुरक्षित अंतर ठेवणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. सूत्रसंचालन मुकुंद ठवकर व स्मिता गालफाडे यांनी केले.
बॉक्स
जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांचा गौरव
सशस्त्र सेना ध्वजनिधी संकलनात उत्कृष्ट कामगिरीसाठी जिल्हाधिकारी संदीप कदम व निवासी उपजिल्हाधिकारी शिवराज पडोळे यांचा स्मृतिचिन्ह देवून गौरव करण्यात आला. जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव यांना राष्ट्रपती पोलीस पदक प्राप्त झाल्याबद्दल त्यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेच्या विविध स्पर्धेचे विजेते आयुष्यमान भारत योजनेतील पारितोषिक, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले निबंध स्पर्धा, महाकृषी ऊर्जा अभियानाचे लाभार्थी, पूरपरिस्थिती काळात विशेष कामगिरी करणारे पोलीस जवान आदींचा सत्कार यावेळी करण्यात आला.