वेतनाला विलंब : आॅनलाईनमुळे वेतनाचे बिल रखडलेप्रशांत देसाई भंडाराशिक्षण विभाग पारदर्शक करण्यासोबतच त्यांची सर्व माहिती संगणकावर जोडण्याची प्रक्रिया शिक्षण विभाग राबवित असून सर्व शिक्षकांचे वेतन महिन्याच्या पहिल्या तारखेला देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मात्र, संगणक प्रणाली अद्ययावत झाली नसल्यामुळे शिक्षकांचे वेतन बील स्वीकारण्यात अडचणी निर्माण होत आहे. परिणामी वेतनास विलंब होत असल्यामुळे शासनाचा हा निर्णय शिक्षकांच्याच मुळावर बसला आहे.शिक्षण विभाग आॅनलाईन करण्याचा ध्यास राज्य शासनाने घेतला. मात्र, नियोजनाचा अभाव व दुर्लक्षामुळे आॅनलाईन प्रक्रिया वारंवार बंद पडत आहे. यामुळे जिल्ह्यातील इयत्ता पहिली ते बारवीपर्यंतच्या ३,२६७ शिक्षकाचे वेतन प्रकरणात अडथळा निर्माण झाला आहे. शिक्षण विभागाने सध्या संचमान्यता, सरल, वेतनाची बिले आॅनलाईनने पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, संपूर्ण प्रणाली अद्ययावत झालेली नाही.वेबसाईट वेळोवेळी बंद असल्याने जिल्ह्यातील सर्व शिक्षकांना आॅगस्ट महिन्याचे वेतन २० दिवसांनतर मिळाले आहे. शिक्षक सध्या सरलच्या कामात व्यस्त आहे. शालार्थ, सरलची वेबसाईट वारंवार ‘हॅक’ होत असल्याने ती शिक्षकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. शिक्षकांचे वेतन बील महिन्याच्या दहा तारखेपर्यंत सादर करण्याची जबाबदारी मुख्याध्यापकावर आहे. १५ तारखेपर्यंत वेतन देयक तपासून गटशिक्षणाधिकारी फॉरवर्ड करतील. १६ ते १९ पर्यंत शिक्षणाधिकारी वेतन वेतन बिलाचे बीडीएस काढतील. २० ते २१ पर्यंत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची स्वाक्षरी घेणे व २२ ते २५ तारखेपर्यंत अर्थ विभागाकडून कोषागार कार्यालयाकडे पाठविणे असे शालार्थ वेतन प्रणालीचे वेळापत्रक शिक्षण विभागाने तयार केले आहे. मात्र, वेबसाईट ‘हॅक’ असल्याने सप्टेंबर महिन्याच्या वेतन देयकाची आॅनलाईन प्रक्रिया रखडल्यामुळे पुढील महिन्यात वेळेवर वेतन मिळणार की नाही, याबाबत अनिश्चितता आहे.जिल्ह्यातील ३,२६७ शिक्षकांना फटकाशिक्षकांच्या वेतनाची प्रक्रिया आॅनलाईन करण्यात आली आहे. यासाठी शिक्षण विभागाने टीसीएस कंपनीकडून वेबसाईट बनविली आहे. मात्र, वेबसाईट हॅक होत असल्यामुळे आॅनलाईन वेतन देयके स्वीकारण्याचे काम रखडले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील इयत्ता पहिली ते बारीवीच्या ३ हजार २६७ शिक्षकांचे वेतन वीस दिवस विलंबाने झाले. यापूर्वी शिक्षकांचे वेतन पाच तारखेला व्हायचे, हे विशेष.शासन निर्णय काय म्हणतो?राज्यातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते शालार्थ प्रणालीने महिन्याच्या पहिल्या तारखेला अदा करावयाचे आहे. विलंब झाल्यास शिक्षणाधिकाऱ्यांना जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, संगणक प्रणालीच्या अडथळ्यामुळे शिक्षकांना वेतन विलंबाने मिळाले असून शिक्षणाधिकाऱ्यांवर काय कारवाई होते याकडे सर्व शिक्षकांचे लक्ष लागले आहे.आॅनलाईन प्रणालीचा जिल्ह्यात कुठलीही अडचण नाही. जिल्ह्यातील सर्व शिक्षकांचे आॅगस्ट महिन्याचे वेतन वेळेत देण्यात आले. कुणाचेही वेतन थकीत नाही.- किसन शेंडेशिक्षणाधिकारी (माध्य.), भंडारा.वेतनाला विलंब होत असल्याने सोसायटीतून काढलेल्या कर्जावर व्याज वाढत आहे. वेतनाच्या विलंबाला शिक्षणाधिकारी जबाबदार असून शिक्षक संघ आंदोलन करले.- मुबारक सैय्यदजिल्हाध्यक्ष, प्रा. शि.संघ, भंडारा.
शासन निर्णय शिक्षकांच्या ‘मानगुटीवर’
By admin | Published: September 23, 2015 12:43 AM