माहितीच्या अधिकारात सत्य उघड : नाकाडोंगरी वनपरिक्षेत्रातील प्रकारउसर्रा : लेंडेझरी वनपरिक्षेत्रअंतर्गत मागे झालेल्या गैरव्यवहाराची साही वाळलीच नसतांना पुन्हा एकदा माहिती अधिकाराअंतर्गत नाकाडोंगरी वनपरिक्षेत्राअंतर्गत येणाऱ्या गावात खोटी सही करुन लाखो रुपयाचा गैरव्यवहार झाला असून संबंधीत विभागाने शासनाची फसवणूक केली आहे.पुरनलाल उके रा. आसोली जि.गोंदिया असे माहिती अधिकाराअंतर्गत महालेखाकार यांच्याकडून माहिती मागितली आहे. यासंदर्भात पुरनलाल उके यांनी उपवनसरक्षंक, मुख्य वनसंरक्षक नागपूर, लोक आयुक्त मादाम कामा मुंबई, जिल्हा पोलीस अधिक्षक यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, वनपरिक्षेत्र नाकाडोंगरी अंतर्गत येणाऱ्या गावात सन २०१४-२०१५ मध्ये वनपरिक्षेत्रात नैसर्गिक पुननिर्मिती जाडरेषा अंतर्गत झालेले काम, १३ वा वित्त आयोग केंद्र शासन यामध्ये कमी कामे करुन जास्त खोटे मजूरांचे नाव मस्टर वर दाखवून खोटया सही, आंगठे करुन लाखो रुपयाचा भ्रष्टाचार केला आहे. सदर कामावरील मजूरांना फक्त २०० रुपये प्रतिदिवस प्रमाणे मजूरी देण्यात आली तर त्यांच्याच नावाने खोटी सही, अंगठे घेऊ न २६६ रुपये प्रतिदिन याप्रमाणे शासनाकडून घेण्यात आले.मौजा चिचोली, मौजा रामपूर, मौजा गर्रा बघेडा या मस्टरवर दाखवलेले वनमजूर वासुदेव कवळू खैरे यांचा सायकल स्टोर्स आहे. जगदीश मधुकर नोनारे हे पोस्टाची डाग वाटतात. गोपीचंद तुकाराम कोळवते दोन वर्षापासून बिमार होते ते मृत्यू पावले. रामेश्वर प्रभू लिल्हारे ट्रॅक्टर मालक आहेत हे कधीही वनविभागाच्या कामावर जात नाही. तरीपण त्यांच्या नावाने खोटया सही करुन भ्रष्टाचार केला. तुमसर तालुक्यातील मौजा हिरापूर (हमेशा) या मस्टर वर दाखवलेले कामगार बुधराम श्रीराम सोनवाने यांची किराणा दुकान आहे. राखी रुकन कडू हे गिट्टी खदानचे ठेकेदार आहेत हे कधीही वनविभागाच्या कामावर जात नाही. त्यांची खोटी सही करुन गैरव्यवहार केला.मौजा कवलेवाडा या मस्टरवर दाखवलेले वन कामगार कामावर गेलेच नाही तरीही संबंधीत विभागाने शासनाकडून फसवणूक केली. मौजा आसलपानी या मस्टरवर वन कामगार गेलेच नाही संजय श्रीराम धुर्वे हे ड्रायव्हर आहेत ते सही करतात परंतु त्यांचे नावे आंगठा मारला आहे. मौजा पवनारखारी येथेही असीच घटना घडली आहे. मौजा कारली या मस्टर वर दाखवलेले वनमजूर लक्ष्मण पूनाजी चौधरी हे कृषी उत्पन्न बाजार समिती तुमसरला कामाला जातात, सुरेश कुवरलाल चौधरी टेलर मास्टर आहेत. रामू लालचंद नागपूरे बकऱ्या चारतो, मानिक तुकाराम मडावी, छळीराम दादुराम सर्याम हे अंगठा मारतात पण त्यांचे नावे सही केली आहे. श्रीमन राजाराम उईके कामावर जात नाही तो ७० वर्षाचा म्हातारा माणूस आहे. या मस्टर वर दाखवलेले बोगस मजूर दाखवून खोटया सहीने भ्रष्टाचार केला आहे.मौजा दावेझरी येथील मस्टरवर जविन्द्र समरीत शरणागत हे होमगार्ड आहेत. त्यांच्या नावाने सुद्धा पैसे काढून भ्रष्टाचार केला आहे. त्याचप्रमाणे नाकाडोंगरी वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या मौजा चिचोली (मुक्तीटोला), पांगळी, सुसुरडोह, आष्टी, गोबरवाही आदी गावात जे मजूर कामावर गेले त्यांना २०० रुपये प्रतिदिवस देण्यात आले व त्यांच्या नावाने २६६ रुपये प्रतिदिवस काढण्यात आल्याचीही नोंद पाहावयास मिळाली.काही मजूर कामावर गेलेच नाही तरी त्यांच्या नावाने खोटी सही करुन वनविभागाने शासन व जनता याची फसवणूक केली आहे. आधी लेंडेझरी वनपरिक्षेत्र व आता नाकाडोंगरी वनपरिक्षेत्रात लाखोचा भ्रष्टाचार उघडकीस आले ते माहितीच्या अधिकाराअंतर्गत मिळालेल्या माहितीनुसार तरीही वनविभाग गप्प का? याकडे वनविभाग कोणती कारवाई करते? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (वार्ताहर)
खोट्या स्वाक्षरीच्या आधारे शासनाची फसवणूक
By admin | Published: November 11, 2016 12:51 AM