लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : गत चार वर्षात भाजप सरकारने शेतकऱ्यांना फक्त आश्वासन दिले पण वास्तविकतेमध्ये काम करताना या सरकारने शेतकऱ्यांची पूर्णपणे दिशाभूल केलेली आहे. दिलेले आश्वासन हवेतच विसरून गेले आहेत. ही सरकार शेतकऱ्यांवर सतत अन्याय करीत आहे, असे प्रतिपादन दिल्ली येथे संसद घेरावमध्ये बोलतांना अखिल भारतीय किसान खेत मजदूर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष नाना पटोले यांनी केले.अखिल भारतीय किसान खेत मजदूर काँग्रेसच्यावतीने दिल्ली येथे ‘जवाब दो हिसाब दो किसान खेतमजदूर रॅली व संसद घेराव’ आंदोलन करण्यात आले होते. मोदी सरकार ही पूर्ण पणे शेतकरी विरोधी असल्याचे वारंवार त्यांच्या कायार्तून दिसून आले.त्यात प्रामुख्याने दिल्ली येथे तमिळनाडूच्या शेतकऱ्यांनी तब्बल एक महिना केलेले आंदोलन असो की अन्य आंदोलन शेतकऱ्यांची कोणतीच चिंता मोदी सरकारने केली नाही. उत्तरप्रदेशचे शेतकरी आपल्या मागण्यासाठी पायी चालत दिल्लीला यायच्या आधीच सरकारने त्याच्यावर अमानुष लाठी हल्ला केला होता. अशा या सरकारला जाब विचारण्यासाठी जवाब दो हिसाब दो आंदोलन २३ आॅक्टोबरला राष्ट्रीय अध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वात करण्यात आला होता.शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी त्यांना न्याय मिळण्याकरिता नाना पटोले यांच्या नेतृत्वात दिल्ली येथे संसद घेरावमध्ये भंडारा जिल्हा युवक काँग्रेसने सहभाग नोंदवून शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळाल्या पाहिजे स्वामिनाथन आयोग लागू झाला पाहिजे, शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखल्या पाहिजे यासाठी आंदोलनात युवक काँग्रेसने घोषणाबाजी केली व शेतकरी विरोधी मोदी सरकारने शेतकऱ्यांना दिलेले खोटे आस्वासन शेतकऱ्यांपर्यन्त पोहचविणार असे युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष इंजि. विशाल भोयर यांनी सांगितले.संसद घेरावमध्ये भंडारा जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणे युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सहभाग दर्शविला होता. त्यात प्रामुख्याने जिल्हा उपाध्यक्ष इंजि. विशाल भोयर, यशवंत खेडीकर (साकोली), विधानसभा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन निर्वाण, सुरज पंचबुद्धे, निखिल सिंगनजुडे, नरेश करंजेकर, तसेच अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
सरकारने केली शेतकऱ्यांची दिशाभूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2018 10:24 PM
गत चार वर्षात भाजप सरकारने शेतकऱ्यांना फक्त आश्वासन दिले पण वास्तविकतेमध्ये काम करताना या सरकारने शेतकऱ्यांची पूर्णपणे दिशाभूल केलेली आहे. दिलेले आश्वासन हवेतच विसरून गेले आहेत.
ठळक मुद्देनाना पटोले : आंदोलनातून युवक काँग्रेसची मागणी