लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : रेन वॉटर हार्वेस्टिंग ही योजना किमान सर्व शासकीय व निमशासकीय वास्तू, प्रत्येक शाळा, मोठी प्रतिष्ठाने आदी ठिकाणी सक्तीने राबविण्याची गरज आहे. त्यासाठी भूवैज्ञानिकांनी दखल घेण्याची गरज आहे. पावसाळ्यापूर्वी त्यादृष्टीने नियोजन करण्याची आवश्यकता आहे. अन्यथा पावसाचे पाणी वाहून वाया जाणार आहे. छतावरील पावसाचे पाणी अडवून ही योजना अंमलात आणल्यास भविष्यात पाणी टंचाईची झळ कमी होण्याची शक्यता आहे. अन्यथा पुढील काळात मानवाला आॅक्सिजनप्रमाणेच पाण्याचीही तीव्र टंचाई जाणवण्याची शक्यता निर्माण झाली आहे.मागील अनेक वर्षांपासून भूगर्भातील जलपातळी खालावत चालली आहे. त्यावर मात करण्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग योजना कायमस्वरुपी राबविण्याची गरज आहे. मात्र याकडे प्रशासनासह सर्वांचेच दुर्लक्ष होत आहे. भंडारा जिल्हा नदी, नाले, विहिरी, कुपनलिका, तलाव हे पाण्याचे मुुख्य स्त्रोत आहेत.जिल्ह्यातून वैनगंगा नदीसह सुर, चुलबंध, बावनथडी या छोट्या नद्या वाहतात. याच नदी, नाल्यांच्या स्त्रोतांपासून तालुक्याची पाण्याची गरज भागविली जाते. मात्र हे सर्व पाणी थेट वाहून जात आहे. त्याला कुठेच अडविण्यात येत नाही. मोठे बंधारे नाहीत, की धरणे नाहीत. त्यामुळे कित्येक वर्षांपासून तालुक्यातील पाण्याची पातळी खालावत आहे. दिवसेंदिवस पाणी पातळी खोल जात असल्यामुळे पाण्याचे स्रोत कोरडे पडत आहे.लहान नद्याही आता कोरड्या पडत आहे. यामुळे भविष्यात पाण्याची भीषण टंचाई भासण्याची शक्यता बळावली आहे. पाण्याची अशी नासाडी होत असताना जिल्ह्याला पाणी समस्येने ग्रासले आहे. त्यामुळेच भविष्यातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी भूजल सर्वेक्षण यंत्रणेने तालुक्यात रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प राबविण्याची गरज निर्माण झाली आहे.पाणी समस्येवर तोडगा काढण्यासाठी आता मान्सून पूर्वीच शहरी व ग्रामीण भागात रेन हॉर्वेस्टिंग योजना राबविणे काळाची गरज बनली आहे. ही योजना सर्वत्र सक्तीने राबविल्यास पाणी टंचाईवर मात करणे सहज शक्य होऊ शकते. त्यासाठी दृढ इच्छाशक्तीची गरज आहे. यामुळे जमिनीचा खालावलेला पाणी स्त्रोत वाढू शकतो. भविष्यातील उन्हाळ्यात काही नाले, नदी, विहिरी, तलाव कोरडे पडणार नाहीत.
शासकीय कार्यालयांचे रेन वॉटर हार्वेस्टिंगकडे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2019 10:46 PM
रेन वॉटर हार्वेस्टिंग ही योजना किमान सर्व शासकीय व निमशासकीय वास्तू, प्रत्येक शाळा, मोठी प्रतिष्ठाने आदी ठिकाणी सक्तीने राबविण्याची गरज आहे. त्यासाठी भूवैज्ञानिकांनी दखल घेण्याची गरज आहे. पावसाळ्यापूर्वी त्यादृष्टीने नियोजन करण्याची आवश्यकता आहे. अन्यथा पावसाचे पाणी वाहून वाया जाणार आहे.
ठळक मुद्देजलपातळी खालावली : भविष्यात पाणीटंचाईची चिन्हे