राजेंद्र पटले : धानाची उतारी निम्म्याहून कमीभंडारा : किडीच्या प्रार्दुभावमुळे यावर्षी शेतकरी खुप हवालदील झाला आहे. महागड्या किटकनाशकांचा उपयोग करुन सुध्दा व योग्य तो आवश्यक प्रयोग करुन सुध्दा धानाला शेतकरी वाचवू शकले नाही. सरासरी धानाची उतारी अर्धाहून कमी आली आहे. परिणामी शासनाने धानाचे भाव दुप्पट करावे, अशी मागणी किसान गर्जनेचे संस्थापक राजेन्द्र पटले यांनी केली आहे.काही शेतात तर धान कापायला सुध्दा परवडत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी उभा धानालाच आग लावून जाळून टाकले, अशी भयानक परिस्थिती शेतकऱ्यांनपुढे येऊ न ठेपली आहे. आणि अशात धानाचे भाव अत्यन्त कमी असल्यामुळे शेतकरी अत्यन्त कमी असल्यामुळे शेतकरी अत्यन्त गंभीर संकटात आले आहेत, प्रत्येक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर तनाव दिसत आहे. गंभीर परिस्थतीचा शासनाने योग्य विचार करावा, प्रत्येक शेतकऱ्यांना अर्धी नुकसान भरपाई तरी घ्यावी किंवा कृषी बाजार समितीमध्ये धानाचे भाव दुप्पट करावे, जातीत जास्त तांदुळ निर्यात करण्याचे धोरण ठरवावे,हा वर्ष शेतकऱ्यांसाठी सुलतानी वर्ष म्हणून विशेष रुपाने जाहीर करुन धानाचे भाव दुप्पट करावे. अन्यथा शेतकऱ्यांच्या आत्महत्या दुप्पटीने वाढतील, असा एकदरीत वातावरण दिसत आहे. शेतकऱ्यांला धानाचे भाव सरासरी रु. १००० प्रति क्विंटलच्या आतच यावर्षी पडल्यासारखे वाटत आहे. आणि यामुळे अर्धी सुध्दा लागत निघत नाही आहे. आंदोलनाचा इशाराही किसान गर्जनेचे संस्थापक राजेन्द्र पटले यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)
शासनाने धानाचे भाव दुप्पट करावे
By admin | Published: December 23, 2015 12:42 AM