सुनिल फुंडे : माडगी येथे कुस्ती स्पर्धा, १०० मल्लांचा सहभागतुमसर : भारतीय कुस्तीला मोठी परंपरा असून ग्रामीण परिसरात हा खेळ जीवंत आहे. व्यसनापासून दूर राहण्याकरिता प्रत्येकांनी खेळणे आवश्यक आहे. कुस्ती हा पारंपारिक खेळ वाचविण्याकरिता शासन मदतीची गरज आहे. माडगी (दे.) येथे दरवर्षी कुस्ती स्पर्धा आयोजित केल्या जातात. हा स्तुत्य उपक्रम आहे. असे प्रतिपादन मध्यवर्ती जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष सुनिल फुंडे यांनी केले.ते मानवाधिकार कल्याण समितीतर्फे माडगी (दे.) येथे आयोजित पुरुष - महिला कुस्ती स्पर्धेच्या उद्घाटनाप्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष प्रेमसागर गणवीर, जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष मनोहर सिंगनजुडे, जयप्रकाश भवसागर, नगरसेवक किशोर भवसागर, प्रदेश काँग्रेस सचिव प्रमोद तितीरमारे, जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्षा सीमा भुरे, पं.स. सदस्य अशोक बन्सोड, आशिष पात्रे, शंकर राऊत, उपसरपंच फुकट हिंगे उपस्थित होते. कुस्ती स्पर्धेचे आयोजक तथा जि.प. सदस्य के.के. पंचबुद्धे यांनी पितृमोक्ष अमावस्येला दरवर्षी कुस्ती स्पर्धा आयोजनाचे महत्व विषद केले. याप्रसंगी मान्यवर अतिथींचा शाल व श्रीफळ देऊन पंचबुद्धे यांनी सत्कार केला. भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर येथील सुमारे १०० पुरुष, महिला मल्लांनी सहभाग नोंदविला. याप्रसंगी राष्ट्रपती महात्मा गांधी सेना व्यसनमुक्ती पुरस्कृत बोधानंद गुरुजी यांचा अतिथींच्या हस्ते सत्कार करण्यात आला. संचालन जे.सी. वहीले, स्नेहल रोडगे तर आभार जि.प. सदस्य के.के. पंचबुद्धे यांनी मानले.सामन्यांचे पंच म्हणून मनोहर वहिले, अशोक गाढवे, संजय ठवकर, महादेव ढेंगे, रामदास वडीचार यांनी काम पाहिले. यावेळी अनुराग रोडगे, गौरीशंकर पंचबुद्धे, श्रीराम चवरे, चैनलाल मसरके, सरपंच कौतूका देशभ्रतार, देवसिंग सव्वालाखे, सुभाष सेलोकर, धनंजय कांबळे, संजय भोयर, खुशाल कावळे, देवराम बोंदरे, मंगेश मोहतुरे, शामा तिजारे, मनोज डोये, सुरेश गजभिये, संदीप कांबळे, महेंद्र झुरमुरे, कारूजी वहीलेसह मोठ्या संख्येने परिसरातील नागरिक उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)
कुस्तीच्या प्रोत्साहनाकरिता शासनाने मदत करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 02, 2016 12:34 AM