यावेळी भाजप प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे, खासदार सुनील मेंढे, आमदार डॉ.परिणय फुके, तारिक कुरैशी, जिल्हाध्यक्ष शिवराम गिरीपुंजे, माजी आमदार चरण वाघमारे, बाळा काशिवार, रामचंद्र अवसरे यांच्यासह अनिल मेंढे, चैतन्य उमाळकर, मोहन सुरकर, राजेंद्र फुलबांधे, नगरसेवक आशू गोंडाने, संजय कुंभलकर आदी उपस्थित होते.
बॉक्स
कोरोना रुग्णांची विचारपूस
विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाला भेट दिली. त्यावेळी त्यांनी प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.पीयूष जक्कल यांच्यासोबत चर्चा केली. म्युकरमायकोसिसच्या संदर्भात असलेल्या व्यवस्थेची माहिती घेतली. त्यानंतर, प्रधानमंत्री सहायता निधीमधून रुग्णालय परिसरात उभारण्यात आलेल्या प्राणवायू प्रकल्पाची पाहणी केली. उपचार घेत असलेल्या कोरोना रुग्णांची वॉर्डात जाऊन विचारपूस केली. बुरशीजन्य आजार लवकरात लवकर लक्षात यावा, या दृष्टीने व्यवस्था उभारण्याची सूचना त्यांनी केली. रुग्णालयात दिलेल्या भेटीनंतर जळीत कांडानंतरही शासन गंभीर नसल्याचे दिसून आले. अद्यापपर्यंत अग्निशमनाची कोणतीही व्यवस्था उभारली गेली नाही. आरोग्यप्रती शासन गंभीर नसल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.