मंगळवारपासून संपूर्ण बाजारपेठ बंद आहे. व्यापाऱ्यांमध्ये असंताेष दिसत आहे. याबाबत बाेलताना पालकमंत्री डाॅ. विश्वजित कदम म्हणाले, उद्याेग, व्यापाऱ्यांबाबत एक- दाेन दिवसांत शासनस्तरावर सकारात्म्क निर्णय हाेणार आहे. प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.
रेमडेसिवीरचा काळाबाजार राेखण्याचे आवाहन पालकमंत्र्यांनी केले. औषधी दुकानात वाजवीपेक्षा अधिक दराने रेमडेसिवीर विकले जात असून, आवश्यकता नसताना प्रिस्क्राइब केले जात असल्याची बाब खासदार सुनील मेंढे व आमदार नरेंद्र भाेंडेकर यांनी या बैठकीत उपस्थित केली हाेती.
बाॅक्स
लस उपलब्ध हाेणार
भंडारा जिल्ह्यात लसीकरणाचा वेग चांगला असून, जिल्हा सध्या अग्रस्थानी आहे. एक- दाेन दिवस पुरेल एवढेच डाेस शिल्लक असले तरी जिल्ह्याला पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध हाेईल, अशी ग्वाही पालकमंत्री डाॅ. कदम यांनी दिली. याबाबत आपण आराेग्यमंत्री व विभागीय आयुक्तांशी बाेललाे असल्याचे त्यांनी सांगितले. पात्र लाभार्थ्यांनी कुठलीही शंका न घेता लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
बाॅक्स
बेड व ऑक्सिजन उपलब्ध
भंडारा येथे आयसीयू व ऑक्सिजन बेड उपलब्ध आहेत. सामान्य रुग्णालयात अतिरिक्त १४० बेडची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्याचप्रमाणे खासगी रुग्णालयातही बेड निर्माण करण्यात आले आहेत. साेबत काेविड केअर सेंटरमध्येही बेड उपलब्ध आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी या बैठकीत दिली. काेविड केअर सेंटरमध्ये भाेजनाची उत्तम व्यवस्था असावी याकडे लक्ष देण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. दरम्यान, पालकमंत्र्यांनी सामान्य रुग्णालयातील काेविड लसीकरण केंद्राला भेट दिली.