लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : सर्वसामान्यांच्या जनादेशांमुळे खासदार पदावर निर्वाचित होण्याची मला संधी मिळाली आहे. केंद्र शासनाच्या ज्या काही योजना आहेत. त्या योजना सर्वसामान्यांपर्यंत दु्रतगतीने पोहचविण्यासाठी माझा प्रामाणिक प्रयत्न राहील, असे वक्तव्य नवनिर्वाचित खासदार सुनील मेंढे यांनी केले.भंडारा येथील विश्रामगृहात बुधवारी दुपारी १ वाजता आयोजित पत्रकार परिषदेत खासदार मेंढे बोलत होते. ते म्हणाले, उद्या ३० मे रोजी दिल्ली येथे होणाऱ्या शपथग्रहण सोहळ्याला उपस्थित राहणार आहे. विशेष म्हणजे भाजपने दिलेल्या आश्वासनानुसार सर्वांना न्याय व योजनांचा लाभ देण्यासाठी कटीबध्द आहे. पंतप्रधान मोदी यांच्या कार्यप्रणालीवर जनतेने शिक्कामोर्तब केला आहे. त्यासोबतच जनतेने दिलेल्या विश्वासाला तडा न जाता त्या दृष्टीने काम होत राहील.यात सर्वप्रथम महत्वाकांक्षी योजना असलेल्या प्रधानमंत्री आवास योजनाअंतर्गत सन २०२२ पर्यंत सर्वांनाच घरे उपलब्ध करण्याचा मानस आहे. यासोबत बेरोजगारांसाठी असलेल्या योजना प्रभावीपणे राबविण्याची गरज आहे. आरोग्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण असलेली आयुष्यमान भारत योजनेचा जास्तीत जास्त लोकांना याचा लाभ मिळविण्यासाठी प्रयत्न केले जाईल.गोसेखुर्द प्रकल्पावर आतापर्यंत ९५ टक्के निधी खर्च झाला आहे. पण अजूनपर्यंत शेतकऱ्यांना पाणी मिळाले नाही. विशेषत: लाभ क्षेत्रात वाढ करणे गरजेचे असून ७४ हजार हेक्टर क्षेत्रापर्यंत गोसेखुर्द पाण्याच्या लाभ कसा मिळेल यावर कार्य केले जाईल. तसेच या प्रकल्पाअंतर्गत वितरिका व उपनलिकांचे कामे पुढच्या पावसाळ्यापर्यंत पुर्ण करण्याचा मानस आहे. नाग नदीच्या दुषित पाण्यावर तिसºया टप्प्यात नविन प्रकल्प राबविण्यावर कार्य हाती घेण्यात येणार आहे.भंडारा शहरातील रेल्वेच्या जागेबाबद बोलताना खासदार मेंढे म्हणाले, रेल्वेच्या अखत्यारितील जवळपास १३ हेक्टर जमीनीवर येत्या पावसाळ्यात सामाजिक वनिकरण विभागाच्या पुढाकाराने १४ हजार रोप लावून संवर्धन करण्यावर कार्य केले जाणार आहे. विशेषत: यात वृक्षसंवर्धानाची जबाबदारी तीन वर्षांपर्यंत सामाजिक वनीकरणाची राहणार असून त्यात दोन प्रवेशद्वार पाण्याची सुविधा व सुरक्षा भिंत राहणार आहे.पत्रपरिषदेला भाजपचे शहराध्यक्ष चंद्रशेखर रोकडे, जिल्हा परिषद सदस्य अरविंद भालाधरे, नितीन धकाते, तुषार काळबांधे यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
शासनाच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहचविणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2019 1:08 AM
सर्वसामान्यांच्या जनादेशांमुळे खासदार पदावर निर्वाचित होण्याची मला संधी मिळाली आहे. केंद्र शासनाच्या ज्या काही योजना आहेत. त्या योजना सर्वसामान्यांपर्यंत दु्रतगतीने पोहचविण्यासाठी माझा प्रामाणिक प्रयत्न राहील, असे वक्तव्य नवनिर्वाचित खासदार सुनील मेंढे यांनी केले.
ठळक मुद्देसुनील मेंढे यांची पत्रपरिषद : गोसीखुर्द प्रकल्पांतर्गत लाभक्षेत्र वाढविणे गरजेचे