लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : भंडारा जिल्ह्यात कार्यरत असणाऱ्या सर्व शिक्षकांना बँक व्यवहाराप्रमाणे जीपीएफ खात्याची पासबुक १५ मे पर्यंत देण्यात येईल, असे आश्वासन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी मनोज सूर्यवंशी यांनी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या पदाधिकाऱ्यांना दिली.बुधवारला मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ भंडारा यांना आमंत्रित केले होते. शिष्टमंडळाचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष रमेश सिंगनजुडे यांनी केले. यावेळी दालनात उपमुख्यकार्यकारी मंजुषा ठवकर, जिल्हा मुख्यलेखा व वित्त अधिकारी अशोक मातकर, शिक्षणाधिकारी प्रकाश कोल्हे, उपशिक्षणाधिकारी मोहन चोले उपस्थित होते. यावेळी शिष्टमंडळाने प्राथमिक शिक्षकांना भविष्य निर्वाह निधी नोंदवही मिळण्यात यावे, भविष्य निर्वाह निधीच्या धर्तीवर डीसीपीएस धारकांचा रकमेचा हिशोब आणि पैसे त्यांच्या खात्यावर जमा करून स्लीप आणि पासबुक देण्यात यावे, उच्च श्रेणी मुख्याध्यापकांच्या रिक्त जागा त्वरित भरण्यात यावे, प्राथमिक शिक्षकांना जिल्हा परिषद हायस्कूलला रिक्त जागांवर शैक्षणिक पात्रतेनुसार विकल्पनुसार पदस्थापना देण्यात यावी, प्राथमिक शिक्षकामधून रिक्त जागांवर केंद्र प्रमुख म्हणून पदोन्नती देण्यात यावी, वरिष्ठ/निवड श्रेणी शिक्षकांचे प्रशिक्षण त्वरित आयोजित करण्यात यावे, आंतर जिल्हा बदलीने आलेल्या ११७ शिक्षकांची स्टाफ पोर्टलला ‘करंट जॉईनिंग मॅनेजमेंट डेट’ भंडारा जिल्ह्यातील रुजू दिनांक असावी व गोंदियाहून आलेल्या इतर शिक्षकांची माहिती दुरुस्ती करण्यासाठी एनआयसीला पत्रव्यवहार करण्यात यावे, शाळेतील इलेक्ट्रिक बिल स्थानिक स्वराज संस्थेने भरावे, शालेय पोषण आहार योजनेचे एप्रिल ते नोव्हेंबर २०१७ चे आॅफलाईन बिले त्वरित काढण्यात यावी, वेतन तफावतीचे प्रकरणे त्वरित निकाली काढण्यात यावी, उच्च श्रेणी मुख्याध्यापकांची पदावन्त केलेल्यांची पदोन्नती करण्यात यावी, सहाव्या वेतन आयोगाच्या २,३,४,५ हप्त्याची रक्कम बाकी असलेल्या शिक्षकांच्या खात्यावर जमा करणे, २२ आॅक्टोबरला ज्यांना १२ व २४ वर्ष पूर्ण झाली त्यांचे निवड श्रेणी व वरिष्ठ वेतनश्रेणी प्रकरणे निकाली काढणे आणि २३/१० च्या शासन निर्णय संदर्भात वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करणे, वैद्यकीय परिपूर्ती देयके त्वरित अतिरिक्त निधी देऊन निकाली काढणे, बिंदू नामावलीनुसार शिक्षकांची यादी प्रसिद्ध करण्यात यावी, अतिरिक्त जबाबदारीतून शिक्षकांना मोकळे करावे, आंतर जिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांच्या सेवापुस्तिकेत जिल्हा परिषद व पंचायत सामिती रुजू नोंद घेण्यात यावी, पदवीधर शिक्षकांना वेतनश्रेणी लावणे, जिल्हाअंतर्गत बदलीमध्ये पदवीधर शिक्षकांची विषय निश्चिती यादी प्रसिद्धी करण्यात यावी यासह अनेक प्रश्नावर सकारात्मक चर्चा करण्यात आली.यावेळी जिल्हा अध्यक्ष रमेश सिंगनजुडे, जिल्हा सरचिटणीस ज्ञानेश्वर दमाहे, अशोक ठाकरे, विजय चाचेरे, केशव बुरडे, दुगार्दास भड, प्रतिभा टेंभेकर, मंदा डोंगरे, आशा गिरेपुंजे, केशव अतकरी, नेपाल तुरकर, जे.एम.पटोले, किशोर ईश्वरकर, यशपाल बागमारे, पी टी हातझाडे, अरुण बघेले, आदेश बोंबार्डे, रवी उगलमुगले, नरेंद्र रामटेके, रसेश फटे, मंगेश नंदनवार, कुशाब भोयर, सुरेश ठाकरे, एन. डी.शिवरकर, शिवम घोडीचोर, सुरेश कोरे, विलास दिघोरे, मकरंद घुगे, मुरारी कढव, संतोष खंडारे, वसंता धांडे, विनय धुमनखेडे, संजय झंझाड आदींचा समावेश होता.
आता शिक्षकांना मिळणार जीपीएफची पासबुक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 10:47 PM
भंडारा जिल्ह्यात कार्यरत असणाऱ्या सर्व शिक्षकांना बँक व्यवहाराप्रमाणे जीपीएफ खात्याची पासबुक १५ मे पर्यंत देण्यात येईल, असे आश्वासन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी मनोज सूर्यवंशी यांनी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या पदाधिकाऱ्यांना दिली.
ठळक मुद्देसीईओंचे आश्वासन : अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाशी चर्चा