लोकमत न्यूज नेटवर्ककरडी (पालोरा) : करडी परिसरातील २५ गावांसाठी एकमेव असलेल्या करडी प्राथमिक आरोग्य केंद्रातील सुविधांअभावी रुग्णांना गैरसोयींचा सामना करावा लागतो. ‘रेफर टू भंडारा’ या प्रकारामुळे नागरिकांत असंतोष आहे. नाईलाजाने ३० ते ३५ कि़मी. अंतरावरील सामान्य रुग्णालय व शहरातील खाजगी रुग्णालयांचा आधार घ्यावा लागत असल्यामुळे आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.करडी प्राथमिक आरोग्य केंद्राला ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा देण्याची मागणी राष्ट्रवादीचे मोहाडी तालुकाध्यक्ष वासुदेव बांते यांनी केली आहे. करडी परिसरातील ४५ हजार लोकसंख्येला आरोग्याच्या सुविधा मिळाव्यात नि:शुल्क मिळाव्यात, गरीब रुग्णांचे वेळेवर उपचार व्हावेत, या भावनेतून करडी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र निर्माण करण्यात आले. सुविधांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असताना पर्याप्त निधी उपलब्ध करून देण्यात आला. पर्याप्त साधन व डॉक्टरांच्या उपलब्धतेमुळे १६ तास रुग्णांना सेवा दिली जायची. मात्र, त्यानंतरच्या काळात आरोग्य केंद्राकडे लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केल्याने कधी डॉक्टरांसाठी रुग्णांना तासनतास वाट पहावी लागते. बरेचदा औषधी उपलब्ध राहत नसल्याने खाजगी मेडिकल स्टोर्समधून विकत घ्यावा लागतात. मागील दीड वर्षांपासून येथे डॉक्टरांचे व कर्मचाºयांची पदे रिक्त आहेत. आरोग्याची एकमेव सुविधा उपलब्ध असताना लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे येथे डॉक्टर व सुविधांचा अभाव नित्याची बाब झाली आहे.करडी प्राथमिक आरोग्य केंद्राला ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा प्राप्त झाल्यास येथे पर्याप्त डॉक्टर व कर्मचाºयांची पदे उपलब्ध होतील. औषधांच्या साठ्यातही कमतरता राहणार नाही. रुग्णांना आवश्यक त्यावेळी सुविधा प्राप्त होवून रेफर टू भंडारा हा प्रकार मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत होईल. नागरिकांचा आर्थिक व मानसिक त्रास देखील कमी होईल.जिल्हा सामान्य रुग्णालयात रूग्णांना नेत असताना रूग्ण दगावतात. अशा स्थितीत अपघातात जखमी झालेल्यांचे प्राण वाचविले जाईल. तेव्हा लोकप्रतिनिधींनी उपरोक्त मागणीचा गांभीर्याने विचार करावा, करडी प्राथमिक आरोग्य केंद्राला ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा द्यावा, अशी मागणी वासुदेव बांते यांनी केली आहे.
करडी प्राथमिक आरोग्य केंद्राला ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2017 11:34 PM
करडी परिसरातील २५ गावांसाठी एकमेव असलेल्या करडी प्राथमिक आरोग्य केंद्रातील सुविधांअभावी रुग्णांना गैरसोयींचा सामना करावा लागतो.
ठळक मुद्देबांते यांचे मागणी : असुविधांमुळे रूग्ण झाले त्रस्त