शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी पुढील निवडणूक पाहणार की नाही..."; रोहिणी खडसेंसाठी एकनाथ खडसेंची भावनिक साद
2
दादर-माहीमची निवडणूक अटीतटीची होईल की एकतर्फी? अमित ठाकरे म्हणाले, "मी तुम्हाला..."
3
विधानसभेसाठी सूक्ष्म नियोजन... लोकसभेनंतर वेगळी स्ट्रॅटेजी; भाजप महाराष्ट्रात 'कमबॅक' करणार?
4
विलंबामुळे वाढले टेन्शन, हुकणार होती लग्नाची गाडी; मुंबईवरून निघालेल्या नवरदेवासाठी थांबविली रेल्वे!
5
जळगाव शहर मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार 
6
कैलाश गहलोत भाजपात जाणार, रविवारी दिला होता मंत्रिपदासह आपचा राजीनामा
7
संजय निरुपम यांनाच वोट करा! जान्हवीचा व्हिडिओ पाहून चाहत्यांचा संताप, म्हणाले- "किती पैसे मिळाले?"
8
एकावर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' कंपनी; शेअरमध्ये तुफान तेजी, कोणता आहे हा स्टॉक?
9
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
10
"ती कोणाची तरी पत्नी आहे...", सलमानने ऐश्वर्या-अभिषेकच्या लग्नावर सोडलं होतं मौन
11
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
12
हातात कोयता, भिंतींवर रक्त अन्..; 'सिंघम अगेन'नंतर टायगर श्रॉफच्या Baaghi 4 ची घोषणा, रिलीज डेटही जाहीर
13
तेलंगणा सरकारच्या नोटीसवर दिलजीत दोसांझचं भर कॉन्सर्टमध्येच खरमरीत उत्तर, म्हणाला...
14
जगभर: अमेरिकेत गर्भनिरोधक गोळ्या खरेदीचा सपाटा! विक्री पाहून कंपन्यांचेही डोळे पांढरे
15
Ruturaj Gaikwad वर अन्याय? Devdutt Padikkal नं कशाच्या जोरावर मारली बाजी? जाणून घ्या सविस्तर
16
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
17
रस्ते फुलले, प्रचंड उत्साह आणि देवाभाऊंचा जयजयकार; नागपुरात देवेंद्र फडणवीसांचं शक्तिप्रदर्शन
18
Zomato Share Price : ५०० पार जाणार Zomato चा शेअर; ब्रोकरेज बुलिश, पाहा काय म्हटलंय कंपनीनं?
19
War 2 मध्ये हृतिक रोशनसोबत थिरकताना दिसणार ही अभिनेत्री? चाहत्यांची उत्सुकता शिगेला
20
कांद्याचे भाव का वाढले, सोयाबीनच्या किमतीचं काय? कृषिमंत्र्यांनी दिलं असं उत्तर 

धान्य दुकानदारांना आगाऊ पैसे देण्याची गरज नाही

By admin | Published: January 03, 2016 1:12 AM

घरपोच योजनेंतर्गत शासकीय गोडावूनमधून धान्य वाहनात मांडून देण्याची जबाबदारी ही हमाल कंत्राटदाराचीच असून यापुढे धान्य दुकानदारांना आगावू पैसे देण्याची गरज नाही,....

योजनेचा संभ्रम अखेर दूर : तहसीलदारांनी केले आश्वासिततुमसर : घरपोच योजनेंतर्गत शासकीय गोडावूनमधून धान्य वाहनात मांडून देण्याची जबाबदारी ही हमाल कंत्राटदाराचीच असून यापुढे धान्य दुकानदारांना आगावू पैसे देण्याची गरज नाही, असे तुमसरचे तहसीलदार डी.टी. सोनवाने यांनी तुमसर व मोहाडी तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांच्या संयुक्त बैठकीत स्पष्ट करून दुकानदारांना घरपोच योजनेबाबत आश्वासित केले. यावेळी एच. एस. मडावी, सुनिल लोहारे, मोहाडीचे गणवीर, गोदाम व्यवस्थापक मेश्राम व बोरकर यांच्यासह स्वस्त धान्य दुकानदार संघाचे जिल्हाध्यक्ष अरविंद कारेमोरे, गुलराज कुंदवानी, प्रमोद घरडे, शालीकराम गौरकर, भूपत सार्वे, बाळू भोबळे, मंचावर उपस्थित होते.संपूर्ण भंडारा जिल्ह्यात घरपोच योजनेचा शुभारंभ करण्यात आला. परंतु सदर योजनेत योग्य दिशानिर्देश नसल्याने हमाल कामगार व स्वस्त दुकानदारात संभ्रम निर्माण झाला होता. परिणामी हमाल कामगारांनी संप पुकारून काम बंद केले. त्यामुळे ग्रामीण भागातील दुकानापर्यंत महिन्याच्या शेवटी धान्य पोहचल्याने घरपोच योजनेला गालबोट लागले होते. पुढेही तसेच सुरु राहणार काय? या संभ्रमात धान्य दुकानदार सापडले होते. ते दुकानदाराचे घरपोच योजनेविषयी संभ्रम दूर व्हावे, याकरिता अधिकाऱ्यांनी दुकानदारांना उद्भवणाऱ्या अडचणी व समस्येवर योग्य उपाय व मार्गदर्शन सूचवावा म्हणून ग्राहक दिनी तहसीलदारामार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले होते. त्यानुसार तुमसर व मोहाडी तालुक्यातील धान्य दुकानदारांची संयुक्त बैठकीचे आयोजन येथील सिंधी धर्मशाळेत केले होते. त्या सभेत घरपोच योजनेअंतर्गत दुकानदारांना गोडावूनमध्ये न येता चालान द्वारे रक्कम भरल्याच्या नंतर पुढील सात दिवसाच्या आत धान्य दुकानदारांच्या दुकानापर्यंत पोहोचते व्हावे, या करिता वाहतूक कंत्राटदाराला आदेश देण्यात आले. त्याचप्रमाणे या योजनेत येणाऱ्या धान्याच्या प्रती करण्यात २ ते ३ किलो धान्य कमी मिळाले होते. त्यावर सांगताना गोडावूनमधून धान्य मोजूनच मिळणार असून धान्य स्वस्त धान्य दुकानात पोहचल्यानंतर स्वस्त धान्य दुकानदाराने आलेल्या धान्याचे पाच टक्के धान्य मोजून आपली खात्री करेल व तरी सुद्धा धान्य कमी आढळल्यास संबंधितांवर कारवाई होणार असेही सांगितले. त्याचप्रमाणे सर्वात मोठा प्रश्न म्हणजे हमालीबाबतचा तर गोडावून मधून वाहनात धान्य चढविण्याची हमाली देण्याची जबाबदारी हमाल कंत्राटदाराची राहणार आहे. (शहर प्रतिनिधी)