लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : धानाचे कोठार समजल्या जाणाऱ्या पूर्व विदर्भातील भंडारा जिल्ह्यातील धान भरडाईसाठी दुसऱ्या जिल्ह्यात पाठविले जाण्याची तयारी केली जात आहे. धानाची भरडाई भंडारा जिल्ह्यातच करावी, अशी मागणी आमदार डॉ.परिणय फुके यांनी केली आहे. जिल्हाबाहेर धान भरडाई झाल्यास एकट्या भंडारा जिल्ह्यातील दहा हजारापेक्षा जास्त मजुरांवर उमासमारीचे संकट कोसळू शकते.ऑक्टोबर महिन्यापासून खरिपाच्या धान खरेदीला प्रारंभ झाला. लाखो क्विंटल धान खरेदी करण्यात आला. गोडावून हाऊसफुल्ल झाले. याबाबीला सहा महिन्यांचा कालावधी लोटूनही दहा लाख क्विंटल धान खरेदी केंद्रावर पडून आहेत. दुसरीकडे उन्हाळी धानाची खरेदी सुरू असून ते धान कुठे ठेवावे, याची चिंता आहे. आधीच धान भरडाईच्या अनुसंगाने जिल्हा पणन कार्यालयाने नियोजनाप्रमाणे भरडाईचे डीओ वेळेवर दिले नाहीत. परिणामी वेळेच्या आत धान भरडाई झाली नाही. आता २५ दिवसांच्या कालावधीत धान भरडाई होणार तरी कशी, असा युक्तीवाद करीत भंडारा व्यतिरिक्त गोंदिया व नागपूर जिल्ह्यातील ज्या मिलरने आॅफर दिले आहेत, अशांना भरडाईचे काम देण्याचे जिल्हा समन्वय समितीच्या सभेत पार पडले. मात्र असे होवू नये यासाठी कुणीही प्रयत्न केलेले नाही. परिणामी पावसाळ्यापुर्वी धानाची भरडाई करण्यासाठी भंडारा जिल्ह्यातील धान अन्य जिल्ह्यात नेले जाणार आहे.सहा महिन्यांचा कालावधी लोटूनही राज्य शासन धानाची भरडाई करून योग्य नियोजन करण्याच्या मनस्थितीत दिसत नाही. त्या उपरही प्रशासनाने भंडारा जिल्ह्यातील धान अन्य दुसऱ्या जिल्ह्यात भरडाई करण्याचे निर्णय घेतल्याने भंडारा जिल्ह्यातील हजारो मजुरांवर उपासमारीचे संकट कोसळणार आहे. ही भरडाई जिल्ह्यातच व्हावी, अशी आमची मागणी आहे.-डॉ. परिणय फुके, आमदार.
धानाची भरडाई जिल्ह्यातच करावी; अन्यथा दहा हजार मजुरांवर उपासमारीचे संकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2020 11:29 AM