शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

संपामुळे ग्रामपंचायत प्रशासन प्रभावित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2018 10:08 PM

मागण्यांसाठी ग्रामपंचायतच्या संगणक परिचालक यांनी १ जानेवारीपासून संप पुकारला आहे. यामुळे ग्रामपंचायतचे प्रशासन प्रभावित झाले आहे.

ठळक मुद्देसंगणीकृत दाखल्यासाठी ओरड : संगणक परिचालकांचा पानटपरीवर ठिय्या

आॅनलाईन लोकमतचुल्हाड (सिहोरा) : मागण्यांसाठी ग्रामपंचायतच्या संगणक परिचालक यांनी १ जानेवारीपासून संप पुकारला आहे. यामुळे ग्रामपंचायतचे प्रशासन प्रभावित झाले आहे.संगणक परिचालकांचे मानधन थकल्याने जानेवारी महिन्याचे सुरुवातीपासून संप पुकारण्यात आला आहे. या संपाला महिना पूर्ण होत आहे. संगणक परिचालकांच्या समस्या निकाली काढण्यासाठी निर्णायक स्थिती निर्माण झाली नाही. ग्रामपंचायतमध्ये असणारे संगणक धुळीत आहेत.संगणक परिचालकांचे संपामुळे ग्रामपंचायतमध्ये संगणकीकृत दाखले प्राप्त होणे बंद झाले आहे. यामुळे गावकरी ग्रामपंचायत प्रशासनाला वेठीस धरत आहेत. राज्य शासन ग्रामपंचायतला विकास कामासाठी अनुदान देत आहे.या अनुदानाचे १० टक्के राशी संगणक परिचालकांचे मानधनावर खर्च करण्यात येत आहे. यामुळे अल्प अनुदान राशीत गावाचे विकास कामे प्रभावित होत आहेत. गावात कामे करताना अडचणी येत असल्याने सरपंच आक्षेप घेत आहेत. राज्य शासनाने या संगणक परिचालकांना स्वतंत्र मानधन राशी देण्याची आवश्यकता असल्याचे सरपंच यांनी नमूद केले आहे.दरम्यान ग्रामपंचायत प्रशासनात संगणक परिचालकांनी संप पुकारल्याने त्याचा पानटपरीवर ठिय्या दिसून येत आहे. सिहोरा परिसरात रोज संगणक परिचालक पानटपरीवर चर्चा करताना दिसून येत आहे. गावकरी दाखल्यासाठी संगणक परिचालकाचे थेट घर गाठत आहेत.दिवसरात्र कधीही त्याचे घरावर थाप दिली जात आहे. शासकीय कार्यालयात संगणक दाखल्यांना अनिवार्य करण्यात आले आहे. यामुळे गावकºयांची चांगलीच धांदल उडत आहे. तात्काळ तोडगा काढण्याची गरज आहे. प्रशासनाच्या भूमिकेकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.संगणक परिचालकांचा संप असल्याने गावकरी दाखले करिता ओरड करीत आहे. प्रशासन प्रभावित ठरत असून तोडगा काढण्याची गरज आहे.-राजेश बारमाटे, सरपंच मुरली.मानधन वाटप व अन्य समस्या निकाली काढण्यात येत नाही तोपर्यंत संगणक परिचालकांचा संप सुरु राहील व न्यायासाठी लढा सुरु आहे.-सुनिल शिवने, तालुकाध्यक्ष संगणक परिचालक संगठणा तुमसर