शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्रिपदावर आज दिल्लीत निर्णय; फडणवीसांना पसंती मात्र ऐनवेळी भाजपा धक्का देणार?
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस लाभदायी, धनलाभ संभवतो!
3
कोण होणार मुख्यमंत्री? विनोद तावडेंनी घेतली अमित शाहांची भेट; 40 मिनिटं चर्चा
4
सत्ता भल्याभल्यांना मोहात पाडते, पण...; श्रीकांत शिंदेंची वडील एकनाथ शिंदेंबाबत भावुक पोस्ट
5
डिसेंबरमध्ये भाजपाच्या नवीन अध्यक्षांची निवड; निरीक्षकांच्या केल्या नेमणुका
6
शिंदे म्हणतात, ‘लढाई’ जिंकली, पण ‘युद्ध’ बाकी; २५ तारखेच्या दिल्लीतील बैठकीत काय घडलं?
7
मविआला पहिला धक्का?; मुंबई महापालिका स्वबळावर लढण्याची उद्धवसेनेची इच्छा
8
सोनिया, राहुल, प्रियांका - संसदेत तिहेरी तोफ; संसदीय इतिहासात पहिल्यांदाच एकत्र
9
डोंगरीत बहुमजली इमारतीला भीषण आग; पाच जखमी; ४० रहिवाशांची सुखरूप सुटका
10
कुजबुज: मोदी-शाहांचे आभार मात्र फडणवीसांचं नावही घेतलं नाही, शिंदेंची नाराजी का?
11
मुंबईतील दुर्दैवी घटना! डंपरच्या धडकेत मायलेकाचा मृत्यू; शाळेत जाताना काळाचा घाला
12
राज्याला भरली हुडहुडी! मुंबईसह उत्तर महाराष्ट्राला थंडीच्या लाटेचा इशारा
13
मानसिक छळाला कंटाळून एअर इंडियाच्या महिला पायलटनं उचललं टोकाचं पाऊल, मित्राला अटक
14
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
15
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
16
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
17
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
18
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
19
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
20
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला

ग्रामपंचायत उमेदवारांना चिंता ऑनलाईन खर्च सादरीकरणाची !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 4:35 AM

भंडारा : ग्रामपंचायत निवडणुकीत निवडणूक आयोगाने यंदा पारंपरिक (ऑफलाईन) खर्च सादर करण्याच्या पद्धतीला फाटा देऊन उमेदवारांना ऑनलाईन खर्च सादर ...

भंडारा : ग्रामपंचायत निवडणुकीत निवडणूक आयोगाने यंदा पारंपरिक (ऑफलाईन) खर्च सादर करण्याच्या पद्धतीला फाटा देऊन उमेदवारांना ऑनलाईन खर्च सादर करण्यासाठी ॲप विकसित केले आहे. उमेदवारांसाठी ते डोकेदुखी ठरत असून, अनंत अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे निवडणूक खर्च ऑफलाईन स्वीकारावा, अशी मागणी होत आहे.

निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मोबाईलमध्ये ऑनलाईन टू व्होटर ॲप डाऊनलोड करून त्यात खर्च सादर करावा लागत आहे. जिल्ह्याची परिस्थिती पाहता ऑनलाईन खर्च सादर करणे म्हणजे उमेदवारांसाठी तारेवरची कसरत आहे. निवडणुकीत उभे असलेल्या काही उमेदवारांकडे ॲन्ड्राईड मोबाईल नाही. तसेच आयोगाचे हे ॲप व्हर्जनच्या मोबाईलमध्येच डाऊनलोड होत आहे.

...या आहेत अडचणी

टू व्होटर ॲप एका मोबाईलवर इन्स्टॅाल केल्यानंतर दुसऱ्या मोबाईलवर उमेदवाराचा नंबर वापरून करता येणार नाही. कारण केवळ एकाच मोबाईलचा नोंदणी क्रमांक एका व्यक्तीसाठी करण्याची व्यवस्था आहे. शिवाय मोबाईलमध्ये भरपूर स्पेस असणे आवश्यक आहे. हे ॲप इन्स्टॅाल करण्यापूर्वी संबंधित उमेदवाराने ऑनलाईन नामनिर्देशन अर्ज भरलेला असणे आवश्यक आहे.

प्रत्येक उमेदवाराला याच्या ॲन्ड्राईड मोबाईलवर हे ॲप इन्स्टॅाल करून त्यात खर्च भरावा लागणार आहे. तसेच ज्यांनी ऑफलाईन अर्ज दाखल केले त्यांना अडचणी निर्माण झाल्या आहेत.

उमेदवारांपुढे प्रश्नचिन्ह

उमेदवार सातवी पास असला तरी काही उमेदवारांची परिस्थिती हलाखीची असल्याने त्यांच्याकडे ॲन्ड्राईड मोबाईल नाही. शिवाय त्यांना माहिती नसल्याने खर्च कसा सादर करायचा, या विवंचनेत उमेदवार आहेत. जिल्ह्याची परिस्थिती पाहता लाखांदूर, तुमसर, भंडारा, साकोली, लाखनी, पवनी, मोहाडी या तालुक्यातील अनेक गावांत रेंज नसल्याने अडचणीचे ठरत आहे.

दुर्गम भागात अडचणी

दुर्गम भागात गेल्या काही वर्षात मोबाईलचा वापर वाढला असला तरी टूजी आणि थ्री जी नेटवर्कही योग्य प्रकारे चालत नसल्याने समस्या निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. त्यातून उमेदवारी अर्ज दाखल करताना अनेक अडचणी आल्या होत्या. यामुळे आता निवडणूक खर्च कसा भरावा, याबाबत विजयी आणि पराभूत उमेदवारांची घालमेल सुरू झाली आहे.

मोबाईलचा वापर कमी

उमेदवारांनी ॲप डाऊनलोड केले असले तरी ते कसे भरावे, याची माहिती नसल्याने अडचणी येत आहेत. अनेक ठिकाणी नेटवर्क नसल्याने उमेदवारांना माहिती भरणेही अवघड जात आहे. ऑनलाईन अर्ज भरण्यास अडचणी आल्याने शेवटच्या दिवशी ऑफलाईन पद्धतीने अर्जाचा भरणा करण्यात आला होता.

निवडणूक आयोगाने पूर्वीप्रमाणेच ऑफलाईन पद्धतीने निवडणूक खर्च सादर करण्यास परवानगी द्यावी. निदान खर्च सादर करताना तरी ऑनलाईनचा ससेमिरा मागे घ्यावा.

- ज्योती नंदेश्वर, खुटसावरी, उमेदवार