शहरं
Join us  
Trending Stories
1
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
2
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
3
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
4
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
5
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
6
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
7
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
8
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
9
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
10
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
11
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
12
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
13
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
14
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
15
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
16
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
17
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
18
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
19
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

अड्याळ नगरपंचायतीत समाविष्ट होण्यास ग्रामपंचायतींचा नकार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 01, 2024 1:47 PM

पाठविला प्रस्ताव : अड्याळ नगरपंचायत होणार की नाही ?

विशाल रणदिवेलोकमत न्यूज नेटवर्क अड्याळ : अड्याळ ग्रामपंचायत हद्दवाढ संदर्भात नेरला, सोंदळ, सुरबोडी, सालेवाडा, केसलापुरी व चकारा या गावांना समाविष्ट करून अड्याळ नगरपंचायत करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला होता; मात्र या सहाही ग्रामपंचायतींनी अड्याळमध्ये सहभागी होण्यासाठी स्पष्ट नकार दिला आहे. पहिल्या टप्प्यात ग्रामपंचायतीच्या नकारघंटेमुळे अड्याळ नगरपंचायत होणार की नाही? याची उत्सुकता व चर्चा रंगली आहे. 

महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ चे कलम ३४१ अ मधील तरतुदीनुसार जिल्हाधिकारी भंडारा यांनी सन २०११ च्या जनगणनेनुसार लोकसंख्या, ग्रामपंचायतीच्या क्षेत्रातील अकृषक रोजगाराची टक्केवारी, ग्रामपंचायतींचा नगरपंचायतीमध्ये रूपांतर करण्याबाबतचा ग्रामपंचायतींचा ठराव, गट किंवा सर्व्हे नंबर दर्शवणारी अनुसूची 'अ' व 'ब', नागरीकरणाचे सर्व्हे क्रमांक, गावठाण क्षेत्र, अकृषिक असलेले क्रमांक यासह अन्य आवश्यक बाबींच्या पूर्ततेसह प्रस्ताव जिल्हा प्रशासनाला सादर करावयाचा होता. 

याबाबत आमदार नरेंद्र भोडेकर यांनी अड्याळ ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रूपांतर करण्याबाबतची मागणी मुख्यमंत्री यांच्याकडे केली होती. यावर जिल्हा प्रशासनाने मागितलेल्या प्रस्तावासंदर्भात अड्याळलगतच्या सहा ग्रामपंचायतींनी विलीन होण्यास नकार दर्शविला. नगरविकास विभाग मंत्रालयाच्या अवर सचिवांकडून आलेल्या पत्रात जिल्ह्यातील अड्याळ नगरपंचायत स्थापन करणे बाबतचा प्रस्ताव शासनास प्राप्त झाल्याचे म्हटले होते. त्यामधील अड्याळ, नेरला व सौंदड या ग्रामपंचायतीच्या क्षेत्रातील संपूर्ण सर्व्हे क्रमांकाची यादी अनुसूची 'अ' तसेच या तीन ग्रामपंचायतीच्या सीमेलगत असलेल्या सर्व्हे क्रमांकाची यादी अनुसूची "ब" तत्काळ शासनास सादर करावी असा स्पष्ट उल्लेख केला आहे. भविष्यात या सहा ग्रामपंचायती तयार होऊन अड्याळ नगरपंचायतीत सहभागी होणार काय? याकडे समस्त ग्रामस्थांचे लक्ष लागून आहे.

तर सुविधा मिळणार काय?अड्याळ गावात इतर सहा गावांचा समावेश करून नगरपंचायत स्थापन करण्याच्या हालचाली सुरू आहेत; मात्र सद्यःस्थितीत एकच ग्रामपंचायत असताना नागरिकांना शुद्ध पाणी व इतर मूलभूत सुविधांची कमतरता जाणवते. नगर पंचायत झाल्यावर गावाचा विस्तार वाढेल तर खरंच सुविधाही मिळणार काय ? असा सवाल व चर्चाही गावात सुरू आहे.  

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतbhandara-acभंडारा