आॅनलाईन लोकमतलाखांदूर : कान्हाळगाव येथील स्वस्त धान्य दुकानातील १७ क्विंटल धान्य शिधापत्रिकाधारकांना न देता गोंदिया जिल्ह्यातील एका व्यापाऱ्याला परस्पर देत असताना मंगळवारला सकाळच्या सुमारास गावकऱ्यांनी हे धान्य रंगेहाथ पकडले. या घटनेमुळे लाखांदूर तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानातील सावळागोंधळ पुन्हा एकदा उघडकीस आला आहे.शिधापत्रिकाधारकांना स्वस्त दरात धान्याचा पुरवठा तहासिल कार्यालयाच्या अन्न पुरवठा विभागामार्फत करण्यात येतो. परंतु लाभार्थ्यांचे हे धान्य जास्त किमतीत व्यापाऱ्यांना विकण्याचा गोरखधंदा लाखांदूर तालुक्यात मागील अनेक वर्षांपासून सुरू आहे. काही शिधापत्रिकाधारक धान्य उचलून दुकानदारालाच जास्त किमतीने विकत असल्याचा प्रकारही यापूर्वी उघडकीस आला आहे. असाच प्रकार कान्हाळगाव येथे घडला. मिनिडोर चालक हरिचंद्र डोंगरे रा.नवेगावबांध यांच्या माहितीनुसार, सांगण्यावरून स्वस्त धान्य दुकानदाराने शिधापत्रिकाकडून विकत घेतले. हे धान्य एकत्र करून ३५ कट्टे (१७ क्विंटल) धान्य गोंदिया जिल्ह्यातील नवेगावबांध येथील माहेश्वरी राईस मिलच्या मालकाला नेऊन देणार असल्याचे सांगितले.दरम्यान, मंगळवारला सकाळी ८ वाजता मिनिडोर (एम.एच.१५/सी.के. ४४३१) ने ३५ कट्टे तांदूळ नेत असताना ग्रामस्थांनी रंगेहात पकडले. त्यानंतर ग्रामपंचायत सदस्य, तंटामुक्त सदस्य व गावकऱ्यांनी पोलीस विभाग व तहसील कार्यालयातील अधिकाऱ्यांना माहिती दिली. पोलीस निरीक्षक मंडलवार हे पोलीस ताफा घेऊन घटनास्थळी पोहोचले. तोपर्यंत अन्न पुरवठा विभागाचे अधिकारी घटनास्थळी न पोहोचल्यामुळे गावकऱ्यांनी रोष व्यक्त केला. या धान्याचे वजन केले असता त्यात १७ क्विंटल २६ किलो धान्य आढळून आले. गावातील नागरिकांसमोर पंचनामा करण्यात आला. आता पुढील कारवाई तहसील कार्यालयाचे अन्न पुरवठा विभाग व पोलीस विभाग हे करीत आहेत.कान्हाळगाव येथील गावकऱ्यांनी पकडलेले धान्य हे शिधापत्रिका धारकांचे आहे. आम्हीच दुकानदारांना जादा दराने विकल्याचे शिधापत्रिकाधारकांनी कबुल केले आहे. तरीपण शासकीय धान्याची अफरातफर हा गुन्हा आहे. त्यामुळे सदर दुकानंदाराविरूद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल.- मनोज डहारे, अन्न पुरवठा निरीक्षक लाखांदूर.स्वस्त मिळालेले धान्य शिधापत्रिकाधारक जादा दराने दुकानदाराला विकत असेल तर अशा शिधापत्रिकाधारकाला धान्याची गरज नसल्याचे समजून ते शिधापत्रिका रद्द करावे. या स्वस्त धान्य दुकानंदारावर कारवाई करण्यात यावी.- एस. एन. रामटेके, सरपंच कान्हाळगाव
ग्रामस्थांनी पकडली धान्याची अफरातफर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2018 11:11 PM
आॅनलाईन लोकमतलाखांदूर : कान्हाळगाव येथील स्वस्त धान्य दुकानातील १७ क्विंटल धान्य शिधापत्रिकाधारकांना न देता गोंदिया जिल्ह्यातील एका व्यापाऱ्याला परस्पर देत असताना मंगळवारला सकाळच्या सुमारास गावकऱ्यांनी हे धान्य रंगेहाथ पकडले. या घटनेमुळे लाखांदूर तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानातील सावळागोंधळ पुन्हा एकदा उघडकीस आला आहे.शिधापत्रिकाधारकांना स्वस्त दरात धान्याचा पुरवठा तहासिल कार्यालयाच्या अन्न पुरवठा ...
ठळक मुद्दे१७ क्विंटल धान्य जप्त : कान्हाळगाव येथील प्रकार