लोकमत न्यूज नेटवर्कमोहदुरा : शिक्षणाशिवाय समाजामध्ये परिवर्तन होणार नाही. विद्यार्थी जसा मोठा होत जातो तसा त्याचा सर्वांगीण विकास होत जातो. श्रीमंत व गरीब यांच्यातील दरी वाढत असून जीवनात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी गरीब परिस्थितीला न घाबरला समोर जावे, असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश डोंगरे यांनी केले.जीवन विकास शिक्षण संस्था लाखनीद्वारा संचालित अशोक वरिष्ठ प्राथमिक शाळा तथा विद्यालयाच्या तीन दिवसीय वार्षिक स्रेहसंमेलन उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते. त्यांच्या हस्ते स्रेहसंमेलनाचे व विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. अध्यक्षस्थानी भंडारा डि. से. बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भंडाराचे महामंत्री प्रभाकर सपाटे, समाजकल्याण सभापती रेखा वासनिक, ज्ञानेश्वर रहांगडाले, जि.प. सदस्य, वंदना पंधरे, जि.प. सदस्या, अनिल निर्वाण नगरसेवक लाखनी, संस्था सचिव दिनदयाल खोब्रागडे, सरपंचा वैशाली खोब्रागडे, उपसरपंच दिपक काडगाये, संस्था उपाध्यक्ष डॉ. धीरज खोब्रागडे, मुख्याध्यापक प्रवीण गजभिये, मुख्याध्यापिका मालती खोब्रागडे उपस्थित होते.यावेळी कार्यक्रमाच्या सुनील फुंडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना, ग्रामीण भागातील विद्यार्थी हा कठीण परिस्थितीमधून घडत असतो म्हणूनच तो स्पर्धेत न डगमगता टिकून राहतो, असे सांगितले. तसेच दुसऱ्या दिवशी सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन आंनदराव देशमुख सामाजिक कार्यकर्ता मेंढा, सोमलवाडा यांच्या हस्ते करण्यात आले तर कार्यक्रमाध्यक्ष म्हणून पं.स. लाखनीचे खंडविकास अधिकारी धीरज पाटील होते. प्रमुख पाहुणे श्रीकांत नागलवाडे विस्तार अधिकारी, सुभाष बावनकुळे विस्तार अधिकारी पं.स. लाखनी, श्रावण हजारे, नागोराव चोपकर, वसंता तितिरमारे, दामु निंबार्ते, रविशंकर डाकरे, सारंगधर काडगाये, सुरेश तितिरमारे, रविशंकर मडावी उपस्थित होते.स्रेहसंमेलनाचे बक्षीस वितरण पंचायत समिती सभापती खुशाल गिदमारे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अध्यक्ष म्हणून दादु खोब्रागडे माजी सभापती तथा पंचायत समिती सदस्य लाखनी तर प्रमुख पाहुणे विजु कापसे, पंकज शामकुवर, घनश्याम देशमुख, विकास गायधने, रामप्रसाद हजारे, राकेश हजारे, देवानंद काडगाये, नत्ुि पिंपळशेंडे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. अहवाल वाचन विद्यार्थीनी प्रतिनिधी मनस्वी लोणारे हिने केले तर प्रास्ताविक मोहन बोंदरे, सुलभा खोब्रागडे यांनी केले. रमण लोणारे यांनी उपस्थितांचे आभार माने तर सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थ्यांनी यासाठी परिश्रम घेतले.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी गरिबीला न घाबरता समोर जावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2019 1:12 AM
शिक्षणाशिवाय समाजामध्ये परिवर्तन होणार नाही. विद्यार्थी जसा मोठा होत जातो तसा त्याचा सर्वांगीण विकास होत जातो. श्रीमंत व गरीब यांच्यातील दरी वाढत असून जीवनात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी गरीब परिस्थितीला न घाबरला समोर जावे, ......
ठळक मुद्देरमेश डोंगरे : रेंगेपार कोठा येथील अशोक विद्यालयाचे स्नेहसंमेलन