शहरं
Join us  
Trending Stories
1
संजूचं शतक; आफ्रिकेत फिरकीची 'करामत' अन् सूर्याच्या कॅप्टन्सीत टीम इंडियाचा विजयी धडाका कायम!
2
ठाण्यात बिल न देता हॉटेलात जायची सवय तेच दावोसमध्ये केले; जयंत पाटलांचा शिंदेंना जोरदार टोला 
3
रावेरचे माजी आमदार आर. आर. पाटील यांचे निधन
4
मिस्ट्री स्पिनरची जादू; दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातील स्फोटक फलंदाज ठरले फुसका बार!
5
मी शिवसेना सोडली तेव्हा ३५ आमदार, १५ खासदार माझ्याकडे आलेले...; राज ठाकरेंचा एकाच वाक्यात उद्धव, शिंदेंवर नेम
6
Aiden Markram नं रुबाब दाखवला; पण Arshdeep Singh समोर तो फिका ठरला (VIDEO)
7
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
9
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
10
फक्त एक षटकार मारला त्यातही सुर्या भाऊची हवा! IPL मधील २१ कोटींचा सिक्सर किंग पडला मागे
11
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
13
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
14
कोणाचा फोटो लावायचा, हा आमचा निर्णय; मोदींचा फोटो न लावण्यावरुन नवाब मलिक स्पष्ट बोलले
15
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
16
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
17
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
18
ऐकावं ते नवलच! १२ वर्षे जुन्या कारचे अंत्यसंस्कार, चार लाख खर्च करुन बांधली समाधी
19
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
20
"अरे देवा...", राहुल-अथियाने दिली गुडन्यूज; सूर्यकुमारची पत्नी देविशाच्या कमेंटनं मात्र वेधलं लक्ष

‘आदर्श’ ग्रामसेवक पुरस्कार वितरण सोहळा रखडला

By admin | Published: January 17, 2017 12:15 AM

ग्रामसेवक हा ग्रामविकासाचा कणा असून ग्रामीण भागातील विकासामध्ये त्यांचे अत्यंत महत्वाचे योगदान आहे.

वेतनवाढीचा प्रश्न ऐरणीवर : चार वर्षांपासून ५६ ग्रामसेवक उपेक्षितप्रशांत देसाई भंडाराग्रामसेवक हा ग्रामविकासाचा कणा असून ग्रामीण भागातील विकासामध्ये त्यांचे अत्यंत महत्वाचे योगदान आहे. ग्रामसेवकांच्या कामाचे मूल्यमापन होऊन गावाची विकासाच्या दिशेने वाटचाल व्हावी, याकरिता शासनाने ‘आदर्श ग्रामसेवक पुरस्कार’ योजना जाहीर केली. परंतु, जिल्हा परिषदने सन २०१२-१३ पासून पुरस्कार वितरण केलेच नसल्याने जिल्ह्यातील ५६ ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी पुरस्कारापासून वंचित आहेत.मध्यंतरी सहाव्या वेतन आयोगाची अडसर टाकीत पुरस्कार देता येणार नसल्याच्या सूचना केल्याने राज्यातील जिल्हा परिषदेतील आदर्श ग्रामसेवक पुरस्कारांचे वाटप वांद्यात सापडले होते. त्यानंतर राज्यातील अन्य जिल्हा परिषदमध्ये पुरस्काराचे वितरण करण्यात आले. मात्र, भंडारा जिल्ह्यातही हा पुरस्कार मागील तीन वर्षांपासून देण्यातच आला नाही. त्यामुळे गावाच्या विकासासाठी दिवसरात्र जागून एक करणाऱ्या ग्रामसेवकाला जिल्हा परिषद पुरस्कारापासून वंचित ठेवत असल्याच्या प्रतिक्रिया उमट आहे. गावाच्या भल्यासाठी झटणाऱ्या ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकाऱ्यांसाठी शासनाच्या ग्रामविकास मंत्रालयाने आदर्श ग्रामसेवक पुरस्कार योजना जाहीर केली. गांधी जयंतीच्या पार्श्वभूमीवर हा पुरस्कार ग्रामसेवकांना पालकमंत्र्यांच्या हस्ते देण्याची तरतूद शासनाने केली आहे. प्रत्येक पंचायत समितीस्तरावरून एक ग्रामसेवक व एक ग्रामविकास अधिकारी असे दोघे या पुरस्कारासाठी निवडायचा असून, त्याच्या कामाचा प्रस्ताव विस्तार अधिकारी, खंडविकास अधिकारी यांच्या स्वाक्षरीने जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे पाठविण्याचे सोपस्कार आहे. या प्रस्तावाची अंतिम यादी मुख्य कार्यपालकन अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली पूर्ण होते. गांधी जयंती हा ‘गावगाडा’ दिवस म्हणूनही साजरा होतो. गावाच्या विकास वर्षाची सुरुवात म्हणून या दिवशी हे पुरस्कार देणे क्रमप्राप्त आहे. ग्रामसेवकांच्या कामाचे श्रेय म्हणून त्यांना पगारात एक वेतनवाढ देण्याचे धोरण आहे. मात्र, जिल्हा परिषदने मागील चार वर्षांपासून या पुरस्काराचे वितरणच केले नाही. सहावा वेतन आयोग कर्मचाऱ्यांना लागू झाल्याने ग्रामसेवकांसह अनेक कर्मचाऱ्यांच्या पगारात कमालीची वाढ झाली. त्यामुळे हा पुरस्कार देताना ही वेतनवाढ देणे शक्य नसल्याचे शासनाने जावई शोध केला आहे. याच कारणावरून ही पुरस्कार योजना थंडबस्त्यात पडल्याचे समजते. ग्रामविकासचे उत्कृष्ठ कार्य करणाऱ्या ग्रामसेवकांना वेतनवाढीसोबतच त्यांनी केलेल्या कार्याची पावती म्हणून हा पुरस्कार देवून सन्मानित करणे महत्त्वाचे आहे. समारंभ न घेता केवळ कागदोपत्री पंचायत समितीला कळविण्याऐवजी प्रत्यक्ष समारंभात गौरव करून त्यांच्या कार्याची दखल घ्यावी. यामुळे ग्रामसेवकांच्या मानसिकतेत बदल होवून गाव विकासाला चालना मिळेल.एस. टी. भाजीपाले, जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन, भंडारा.कर्मचारी पुरस्कारापासून वंचितएका पंचायत समितीमधून एक ग्रामसेवक व एक ग्रामविकास अधिकारी असे दोघांची पुरस्कारासाठी निवड करायची आहे. जिल्ह्यात सात पंचायत समिती असल्याने एका वर्षातील दोन याप्रमाणे वर्षभरात चौदा तर चार वर्षात ५६ ग्रामसेवकांना हा पुरस्कार प्राप्त होणार आहे. मात्र, जिल्हा परिषदने पुरस्कार वितरण सोहळा घेतला नसल्याने ग्रामसेवक संवर्गातील कर्मचारी पुरस्कारापासून वंचित आहेत.