बुलडाणा : एडेड हायस्कूल ही शाळा बुलडाण्यात १९२७ पासून कार्यरत असून २०१८ पर्यंत शाळेला ९० वर्षे पुर्ण झाले आहेत. यानिमित्त सर्व माजी विद्यार्थी एकत्र यावेत या उद्देशाने आजी-माजी विद्यार्थ्यांचे महासंमेलन डिसेंबरमध्ये येणार आहे. संमेलनाचा उद्देश समाजाच्या विविध स्तरांमध्ये कार्यरत असलेल्या माजी विद्यार्थ्यांना सर्व माहिती उपलब्ध करून देणे आहे. जून्या स्मृती जागृत करणे आणि त्या मार्फत सर्व विद्यार्थ्यांसाठी कायमस्वरूपी संपर्क व्यासपीठ तयार करणे हा आहे. तसेच आजी-माजी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक मार्गदर्शन, बेरोजगारी दूर करून उद्योगधंदा मिळावा आपुलकीचे स्नेहाचे नाते वृद्धींगत व्हावे, असा आहे, अशी माहिती शाळेचे माजी विद्यार्थी श्रीकांत देशपांडे (नागपूर) यांनी एडेड हायस्कूल येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. याप्रसंगी बुलडाणा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. प्रमोद देशपांडे, प्राचार्य आर. ओ. पाटील, सेवानिवृत्त शिक्षक सदानंद काणे (यवतमाळ), माजी विद्यार्थी कमलेश कोठारी, आनंद संचेती, शिक्षक रघुनाथ देशपांडे, अंजली परांजपे उपस्थित होते. याप्रसंगी श्रीकांत देशपांडे यांनी सांगितले, आजपर्यत शाळेत दरवर्षी माजी विद्यार्थी त्या-त्या बॅच च्या विद्यार्थ्याचे स्नेहमिलन आयोजित करत आले आहेत. पण त्यात केवळ एकाच बॅच मधील विद्यार्थी भाग घेतात. या महासंमेलनाद्वारे सर्व माजी विद्यार्थी एकत्र आणून त्यांच्यात संवाद निर्माण करून दिला तर त्याचा उपयोग सर्वाना होईल. आयुष्याच्या धावपळीत जूने दिवस पुन्हा संगळ्यांना जगता यावे. आणि त्या माध्यमातून इतक्या वर्षात सैल झालेली मैत्री पुन्हा मजबुत व्हावी, यासाठी २२ व २३ डिसेंबरला महासंमेलन आयोजित करण्यात आले आहे. आतापर्यत या साठी ४६ बॅच मधील जवळपास तीन हजार विद्यार्थ्यांसोबत संपर्क झाला असून अजून ४४ बॅच विद्यार्थ्यांसोबत संपर्क होणे बाकी आहे. ज्या माजी विद्यार्थ्यांना या संमेलनात यायचे आहे, त्यांनी कमलेश कोठारी, श्रीकांत देशपांडे, आणि आनंद संचेती यांच्याशी संपर्क साधावा, या संमेलनामध्ये सर्व माजी विद्यार्थ्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन श्रीकांत देशपांडे यांनी केले आहे. कॅप्शन : पत्रकार परिषदेत माहिती देतांना एडेडचे माजी विद्यार्थी श्रीकांत देशपांडे, डॉ. प्रमोद देशपांडे, प्राचार्य आर. ओ. पाटील
बुलडाण्यातील एडेड हायस्कूलमध्ये ९० वर्षापासूनच्या आजी-माजी विद्यार्थ्यांचे होणार महासंमेलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2018 3:06 PM
बुलडाणा : एडेड हायस्कूल ही शाळा बुलडाण्यात १९२७ पासून कार्यरत असून २०१८ पर्यंत शाळेला ९० वर्षे पुर्ण झाले आहेत. यानिमित्त सर्व माजी विद्यार्थी एकत्र यावेत या उद्देशाने आजी-माजी विद्यार्थ्यांचे महासंमेलन डिसेंबरमध्ये येणार आहे.
ठळक मुद्देसंमेलनाचा उद्देश समाजाच्या विविध स्तरांमध्ये कार्यरत असलेल्या माजी विद्यार्थ्यांना सर्व माहिती उपलब्ध करून देणे आहे. सैल झालेली मैत्री पुन्हा मजबुत व्हावी, यासाठी २२ व २३ डिसेंबरला महासंमेलन आयोजित करण्यात आले आहे. ४६ बॅच मधील जवळपास तीन हजार विद्यार्थ्यांसोबत संपर्क झाला असून अजून ४४ बॅच विद्यार्थ्यांसोबत संपर्क होणे बाकी आहे.