मोहाडी : सूर नदीच्या पात्राची अवस्था अगदी शेतजमिनीसारखी झाली आहे. पात्रात माती दिसून येते. त्या मातीवर गवती झुडपे वाढू लागली आहेत. सूर नदीचे अस्तित्व धोक्यात येत असल्याची ही सुरुवात आहे.
शेतजमिनीवर पाणी साचले असल्याचे प्रथमदर्शनी छायाचित्रावरून दिसून येत आहे. पण, हे चित्र मोहाडी तालुक्यातील सूर नदीचे आहे. जवळील गायमुख नदी मातीत मिसळली आहे. रेतीमाफियांनी लहान-मोठ्या जिथून मिळेल तिथून रेतीची चोरी केली आहे. आता तर सूर नदीसारख्या अनेक नद्या रेतीविना दिसून येत आहेत. चोरांनी नदीच्या कडा पोखरून पोखरून रेती चोरून नेली आहे. अनेक रेती चोर मालामाल झाले. पण, निसर्गाची देणं असलेली सूर नदी व तिच्यासारख्या अनेक लहान नद्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. कालांतराने या सूर नदीचे पात्र नदीच्या काठावर असलेले शेतकरी बळकावतील अशी भीती वाटू लागली आहे. मोहाडी - महलगाव या दरम्यान गायमुख नदीचे काही पात्र शेतकऱ्यांनी आपल्या कब्ज्यात केले आहे.
===Photopath===
270621\img_20210626_150610.jpg
===Caption===
सूर नदीच्या पात्रात उगवलेलं गवत