नगरपालिका घेणार पुढाकार : नऊ लाखांचा खर्च अपेक्षितप्रशांत देसाई भंडारादिवसाची सुरूवात चांगली व्हावी, दिवसभर धावपळ व कामाचा व्याप आला तरी त्याला तोंड देता यावे, यासाठी प्रत्येकजण बगिचांचा शोध घेत आहे. परंतु भंडारा शहरातील उद्यानांच्या बकाल अवस्थेमुळे भंडारावासिय निर्मल श्वासापासून वंचित आहेत. त्यासाठी पालिकेने पुढाकार घेऊन ‘ग्रीन जीम’ ही योजना राबविण्याचा संकल्प केला आहे.शहरातील वाहनांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत चालली आहे. वाहनांमधून निघणाऱ्या धुरांमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. आरोग्य सुदृढ रहावे, यासाठी पालिकेने आता पुढाकार घेतला आहे. यासाठी शहरातील दोन उद्यानातील खुल्या मैदानात नागरिकांसाठी ‘जीम’ लावण्यात येणार असून ‘ग्रीन जीम’ मिशनच्या माध्यमातून त्यांना व्यायामाची सवय लावणार आहे.भंडारा शहराची लोकसंख्या लाखाच्यावर आहे. शहराची लोकसंख्या वाढत असताना नागरिकांसाठी सुरू केलेले उद्यानांची अवस्था बकाल झाली आहे. रोज सकाळ-संध्याकाळी बगिच्यात बसून मोकळा श्वास घेता यावा, हा या मागील उद्देश आहे. ज्येष्ठांना व्यायामासाठी तर बालकांना खेळण्यासाठी बगिचा हे हक्काचे ठिकाण आहे. मात्र, पालिकेच्या दुर्लक्षामुळे शहरातील बगिच्यांची दुरावस्था झाली आहे. मिस्कीन टँक चौक व हुतात्मा स्मारकातील बगिचा वगळल्यास एकही बगिच्यात बसण्यासाठी व खेळण्याची व्यवस्था नाही. त्यामुळे पालिकेने आता बगिचा देखभाल दुरूस्तीच्या माध्यमातून अत्याधुनिक व्यायामाचे साहित्य लावण्याचे ठरविले आहे. शहरातील मिस्कीन टँक व हुतात्मा स्मारक उद्यानात ‘ग्रीन जीम’ मिशन सुरू करण्याचा संकल्प पालिकेने केला आहे. या उद्यानात पालिका स्कॉय वॉकर, रोव्हर, पॉमेल हॉर्स, लेगप्रेस, चेस्टप्रेसर, सुर्फ बोर्ड हे व्यायामाचे साहित्य लावण्यात येणार आहे. याबाबत पालिकेने टेंडर काढलेले आहे.काय आहे ‘ग्रीन जीम मिशन’ संकल्पना?अत्याधुनिक व्यायामाच्या साहित्याने शरीराच्या सुदृढतेसाठी व्यायाम करण्याला जीम म्हटले जाते. मात्र, पालिकेचा ग्रीन जीम म्हणजे, बगिच्याच्या खुल्या मैदानावर हे व्यायामाचे साहित्य लावण्यात येणार असून यामुळे परंपरागत जिमला यातून मुक्ती मिळणार आहे. नऊ लाखांचा खर्च अपेक्षितनऊ लाखांचा खर्च अपेक्षित असलेल्या या उद्यानात पालिका स्कॉय वॉकर, रोव्हर, पॉमेल हॉर्स, लेगप्रेस, चेस्टप्रेसर, सुर्फ बोर्ड हे व्यायामाचे साहित्य लावण्यात येणार आहे. याबाबत पालिकेने टेंडर काढले असून ही ‘ग्रीन जीम’ महिनाभरात नागरिकांसाठी खुले होणार आहे.शहरातील बगिच्याची देखभाल दुरूस्तीची जबाबदारी घेणाऱ्यांच्या शोधात पालिका प्रशासन आहे. नागरिकांना निवांतपणा व शरिराची कसरत करता यावी, यासाठी ‘ग्रीन जीम’ योजना अंमलात आणण्याचा ठराव घेऊन त्यादृष्टीने कामाचे नियोजन करण्यात आलेले आहे.- रवींद्र देवतळे, मुख्याधिकारी, नगर पालिका भंडारा.
भंडारेकरांसाठी उद्यानात ‘ग्रीन जीम’ मिशन
By admin | Published: June 02, 2015 12:48 AM