लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : राज्य शासनाच्या मंत्रीमंडळ विस्तारात तीन केंद्रीय मंत्री व दहा राज्यमंत्री यांनी शपथ घेतली. त्यामध्ये भंडारा-गोंदिया चे विधान परिषदेचे आमदार डॉ. परिणय फुके यांना राज्यमंत्रीपदाची शपथ घेताच जिल्ह्यात आनंदोत्सव साजरा करण्यात आला.भंडारा शहर भाजपा व नगर परिषद भंडाराच्या वतीने गांधी चौक भंडारा येथे खासदार सुनील मेंढे यांच्या उपस्थितीत गांधीजींच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. फटाक्यांची आतषबाजी करून पेढे वाटण्यात आले. खासदार म्हणून काम करीत असताना जिल्ह्यात राज्यमंत्री पद देखील आल्यामुळे मतदारसंघाचा विकास अधिक जोमाने करता येईल असा विश्वास खासदार मेंढे यांनी व्यक्त केला. भंडारा - गोंदिया विधान परिषद क्षेत्रातील प्रलंबित कामांना अधिक वेग येईल, असे म्हटले जात आहे. याप्रसंगी मुकेश थानथराटे, चैतन्य उमाळकर, चंद्रशेखर रोकडे, रुबी चढ्ढा, विकास मदनकर, कैलाश तांडेकर, मंगेश वंजारी, मनोज बोरकर, संतोष त्रिवेदी, रजनीश मिश्रा, मिलिंद मदनकर, राजकुमार व्यास, प्रेमचंद भोपे, अजीज शेख, अतुल वैरागडकर, रियाजभाई, फईम शेख, मोरेश्वर मते, रोषण काटेखाये, शैलेश मेश्राम, अजय ब्राम्हणकर, अविनाश ब्राम्हणकर, सचिन कुंभलकर, भूपेश तलमले, निखील तिरपुडे आदी उपस्थित होते.
परिणय फुके यांच्या मंत्रिमंडळात समावेशाने जिल्ह्यात आनंदोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2019 1:01 AM
राज्य शासनाच्या मंत्रीमंडळ विस्तारात तीन केंद्रीय मंत्री व दहा राज्यमंत्री यांनी शपथ घेतली. त्यामध्ये भंडारा-गोंदिया चे विधान परिषदेचे आमदार डॉ. परिणय फुके यांना राज्यमंत्रीपदाची शपथ घेताच जिल्ह्यात आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
ठळक मुद्देभाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष : फटाक्यांची आतषबाजी