शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्टिकल 370 वरून जम्मू-काश्मीर विधानसभेत गदारोळ, हाणामारी अन् पोस्टरही फाडलं; बघा VIDEO
2
“महाराष्ट्राच्या परिवर्तन हवे, जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याचे काम करावे लागेल”: शरद पवार
3
"मित्रपक्षाने अशी दगाबाजी करणं..."; भास्कर जाधवांना संताप अनावर, काँग्रेसला सुनावलं
4
राज ठाकरेंच्या मनसेला आम्ही ऑफर दिली होती, पण...; CM एकनाथ शिंदेंचा दावा
5
ममता बॅनर्जींचा भाचा पश्चिम बंगालचा पुढील मुख्यमंत्री होणार? अचानक राजकीय चर्चांणा उधाण
6
"तुला जीवाची पर्वा आहे की नाही?”; लॉरेन्स बिश्नोई गँगच्या नावाने फॅशन डिझायनरला धमकी
7
शरद पवारांबाबत आक्षेपार्ह भाषा; टीकेची झोड उठल्यानंतर सदाभाऊंकडून दिलगिरी, म्हणाले...
8
Guruwar Astro Tips: कार्तिक महिन्यातला पहिला गुरुवार; झपाट्याने प्रगतीसाठी करा 'हे' चार उपाय!
9
भगीरथ भालकेंनी शरद पवारांशी गद्दारी केली; धैर्यशील मोहितेंची टीका; प्रणिती शिंदेंकडून पलटवार!
10
'फेक नॅरेटिव्ह'च्या फॅक्टरीचे शरद पवार मालक, देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल
11
आधी आरोप, मग अजित पवारांना पवित्र करून घेतले, जयंत पाटील यांचे टीकास्र
12
"मला धमक्या मिळत आहेत...", विक्रांत मेस्सीचा खुलासा; 'द साबरमती रिपोर्ट' ठरलं कारण?
13
अशोक सराफ यांच्या नवीन मालिकेत 'ही' अभिनेत्री साकारणार प्रमुख भूमिका, नव्या प्रोमोने उत्सुकता शिगेला
14
WI vs ENG: कार्टीच्या विक्रमी सेंच्युरीच्या जोरावर कॅरेबियन संघाची मालिका विजयाची 'पार्टी'
15
बाळासाहेब ठाकरेंच्या एका वाक्याने निवडला गेला होता शिवसेनेचा उमेदवार; निकाल काय लागला?, वाचा...
16
"राहुल गांधींनी नागपुरात कोरं संविधान दाखवलं तर मुंबईत..., बाबासाहेबांचा 'हा' अपमान..."; VIDEO शेअर करत भाजपचा हल्लाबोल
17
भाजपच्या ४० बंडखोरांची सहा वर्षांसाठी हकालपट्टी, काही बंडखोरांवर अद्याप पक्षाकडून कारवाई नाही
18
परप्रांतीयांच्या मतांसाठी भाजपचे ‘मायक्रो मॅनेजमेंट’, राज्य, भाषानिहाय डेटा बँक करून जबाबदारी
19
'डिमोशन' झालं तरी KL Rahul मध्ये सुधारणा नाहीच; कसं मिळेल रोहितच्या जागी 'प्रमोशन'?
20
BSNL चा शानदार प्लॅन मिळवण्याचा आजचा शेवटचा दिवस, 365 दिवसांसाठी मिळेल 600GB डेटा!

वाढत्या पाणी मागणीसाठी भूजल व्यवस्थापन गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2019 1:01 AM

दिवसेंदिवस वाढत जाणारा भूजलाचा उपसा, नगदी पिके घेण्याचा कल आणि पाणी टंचाईचे संकट या चक्रातून आज बाहेर पडण्याचे आव्हान शासन तसेच जनमानसावर आहे. जल व मृद संधारणाची राज्यात विविध कामे केली जातात. याचा उपयोग मुख्यत्वे पाणी अडविणे व भूगर्भात मुरविण्याकरीता होतो.

ठळक मुद्देसंडे अँकर । नवनवीन उपाययोजनांची गरज, कृषी आयुक्तांचा पुढाकार, लोकसहभाग महत्त्वाचा

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : दिवसेंदिवस वाढत जाणारा भूजलाचा उपसा, नगदी पिके घेण्याचा कल आणि पाणी टंचाईचे संकट या चक्रातून आज बाहेर पडण्याचे आव्हान शासन तसेच जनमानसावर आहे. जल व मृद संधारणाची राज्यात विविध कामे केली जातात. याचा उपयोग मुख्यत्वे पाणी अडविणे व भूगर्भात मुरविण्याकरीता होतो. मात्र भूजलाच्या शाश्वत व्यवस्थापनासाठी हे पुरेसे नाही हे आता विविध ठिकाणच्या अनुभवाअंती सिद्ध झाले आहे. या आव्हानांवर मात करण्यासाठी लोकसहभाग आधारीत भूजल व्यवस्थापन हा संकल्प पुढे येत आहे.महाराष्ट्र शासनाच्या कृषि व भूजल सर्व्हेक्षण आणि विकास यंत्रणा या दोन विभागांनी संयुक्त विद्यमाने पाणी मागणी आधारीत भूजल व्यवस्थापन करणेकरीता पुढाकार घेतला आहे. यासाठी आयुक्त, कृषि सुहास दिवसे व संचालक, भूजल सर्व्हेक्षण आणि विकास यंत्रणा कौस्तुभ दिवेगांवकर यांनी दोनही खात्यांची बैठक घेऊन याची मुहूर्तमेढ रोवली.यास कृषि खात्यामार्फत अनिल बनसोडे, संचालक (आत्मा), विजय घावटे, संचालक (विस्तार व प्रशिक्षण) तसेच दोनही खात्याचे इतर वरिष्ठ अधिकारी व प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार प्रायमुव्ह, पुणे उपस्थित होते.जागतिक बँक अर्थसहाय्यित जलस्वराज - २ प्रकल्पांतर्गत पुणे, सातारा, अहमदनगर, जळगांव, औरंगाबाद, बुलडाणा व अमरावती या सात जिल्ह्यातील अतिशोषित व शोषित पाणलोटातील १०२ गावांमध्ये हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. शेतीच्या पारंपारिक सुक्ष्म सिंचन उपाययोजनांसोबत काही नाविन्यपुर्ण तंत्रज्ञान जसे की अस्तरीकरण व प्लास्टीक मल्पींग तत्सम तंत्रज्ञानाचा देखील वापर केला जाणार आहे.शेती व भूजल या दोन्ही विषयांचा परस्पर संबंध लक्षात घेता पुढील नियोजन सुकर होण्याच्या दृष्टीकोनातून भूजल व्यवस्थापनाचे हे एक लक्षणीय मॉडेल ठरणार आहे. भविष्यात हा अनेक उपक्रमांना पथदर्शी ठरणार असल्याचे संचालक दिवेगांवकर म्हणाले. दोनही खात्यामंध्ये सामंजस्य कराराद्वारे येत्या खरीप हंगामापासूनच या आराखड्याची सुरुवात होणार असून साधारणपणे पुढील ७ ते ८ महिन्यात याचे दृश्य परिणाम दिसून येतील.अंमलबजावणीची जबाबदारी कृषी विभागाचीपाणी व्यवस्थापनाकरीता करण्यात आलेला हा स्तुत्य उपक्रम असून कृषि खात्यामार्फत अधिकधिक प्रभावीपणे याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.असे कृषी आयुक्त सुहास दिवसे यांनी स्पष्ट केले. तसेच लोकांना पाणी उपलब्धतेनुसार पिक पेरणी करण्याचे आवाहन त्यांनी केले. कृषी विभाग, भूजल सर्व्हेक्षण आणि विकास यंत्रणा यासाठी सज्ज आहे

टॅग्स :water shortageपाणीटंचाई