शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

संचमान्यता शिक्षण उपसंचालक स्तरावर होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2021 4:24 AM

भंडारा : राज्यातील शिक्षक, मुख्याध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या विविध प्रलंबित समस्यांबाबत विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या तक्रारीचे निराकरण करण्यासाठी ...

भंडारा : राज्यातील शिक्षक, मुख्याध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या विविध प्रलंबित समस्यांबाबत विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या तक्रारीचे निराकरण करण्यासाठी शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी मुंबई येथे विदर्भ माध्यमिक शिक्षक संघासोबत बैठकीत राज्यातील शाळांची संचमान्यता शिक्षण उपसंचालक स्तरावर होणार असल्याचे आश्वासन संघटनेच्या शिष्टमंडळाला देण्यात आले.

राज्यातील खासगी, जिल्हा परिषद तसेच नगर परिषद, महानगरपालिकेच्या शाळेतील शिक्षकांची ऑनलाईन संचमान्यता सत्र २०१९-२० पासून अद्यापही झाली नसल्याने राज्यातील हजारो अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाचा प्रश्न ऐरणीवर आहे. त्यामुळे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या तक्रारीत सातत्याने वाढ होत असून, शिक्षक संघटनांसोबत बैठक घेण्याची मागणी वारंवार केली जात होती. शिक्षक संघटनाच्या तक्रारीची अखेर दखल घेत शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी बुधवार रोजी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत मुंबई येथील शिक्षण उपसंचालक कार्यालयात बैठकीचे आयोजन करून शिक्षक संघटनाच्या शिष्टमंडळासोबत सकारात्मक चर्चा केली. यावेळी ऑनलाईन पोर्टल उपलब्ध होत नसल्यास कनिष्ठ महाविद्यालयाप्रमाणे ऑफलाईन संचमान्यता शिक्षणाधिकारी यांनी करून शिक्षण उपसंचालक यांचेकडे अपील करण्याची मागणी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाने लावून धरली. बोगस पटसंख्या दाखवून शासनाचे अनुदान लाटणाऱ्या शाळा, संस्थांवर दंडात्मक कार्यवाहीची तरतूद करण्यात यावी, वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षणात मूळ शासन निर्णय २ सप्टेंबर १९८९ नुसार प्रशिक्षण उपलब्ध नसल्यास प्रशिक्षण पूर्ण करण्याच्या अटीवर, प्रशिक्षणातून सूट देऊन वरिष्ठ श्रेणी व निवडश्रेणी लागू करण्यात यावी. शाळेतील शिपाई हा महत्त्वाचा घटक असून, प्रशासकीय यंत्रणेत या घटकाला कमी वेतनश्रेणी आहे. मात्र शासन निर्णय ११ डिसेंबर २०२० नुसार कंत्राटी अल्प मानधनावर शिपाई पदे भरण्याचा जाचक शासन आदेश रद्द करण्यासाठी खासगी प्राथमिक शिक्षक संघाने १८ डिसेंबर रोजी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालय, भंडारा येथे केलेल्या धरणे आंदोलनाची दखल घेण्यात यावी. विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी दिलेल्या शालार्थ आयडी प्रकरणासंबंधी शासन निर्णयमधील आयुक्त (शिक्षण) व सहसंचालक (प्राथमिक) यांच्या समितीने तक्रारी व अनियमितता तपासावी. नागपूर जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षणाधिकारी व उपशिक्षणाधिकारी यांची रिक्त पदे तातडीने भरण्यात यावी, आदी विषयांवर चर्चा झाली. यावेळी सहसंचालक व्ही.के. खांडके, शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप, अधीक्षक राजेश शिंदे, विमाशि संघाचे प्रमोद रेवतकर, अनिल गोतमारे व इतर संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.