शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
2
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
3
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
4
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
5
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
6
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
7
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
8
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
9
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
10
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
11
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
12
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
13
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
14
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
15
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
16
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
17
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
18
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
19
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...

शेतकऱ्यांची धडधड वाढली

By admin | Published: June 20, 2016 12:27 AM

मृग नक्षत्राच्या सुरुवातीलाच पाऊस येईल, अशा आशेवर शेतकरी होते. हवामान खात्यानेही सुरूवातीपासून दमदार पाऊस होईल, ...

रिमझीम पाऊस : मोठ्या पावसाची प्रतीक्षातुमसर : मृग नक्षत्राच्या सुरुवातीलाच पाऊस येईल, अशा आशेवर शेतकरी होते. हवामान खात्यानेही सुरूवातीपासून दमदार पाऊस होईल, असा अंदाज वर्तविला होता. परंतु, मृग नक्षत्रानेही शेतकऱ्यांना हुलकावणी दिली. हवामानात बदल झाल्याने शुक्रवारला रिमझीम पावसाने जिल्ह्यात सुरुवात झाली आहे. मात्र अजुनपर्यंत जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली नाही. पावसाने जमिनीत टाकलेले महागडे बियाणे जमिनीतच करपण्याचा धोका निर्माण झाल्याने शेतकऱ्यांची धडधड वाढली आहे. शेतकरी कधी अस्मानी तर कधी सुल्तानी संकटांनी शेतकरी होरपळला जात आहे. कृषीप्रधान देशातल्या शेतकऱ्यांची अवस्था आज वाईट आहे. देशातील ७० टक्के शेती आजही निसर्गाच्या पाण्यावर अवलंबून आहे. आजकाल निसर्गही लहरीपणाने वागायला लागला आहे. शेती दिवसेंदिवस बेभरवशाची होत चालल्याने शेतकऱ्यांच्या गळ्याभोवती कर्जाचा फास आवळतो आहे. कर्जातच जन्म घ्यायला आणि आयुष्याची सायंकाळ कर्जाच्या खाईतच करायची, असा शेतकऱ्यांसोबतच चालत आलेला नियम आजतागायत कायम आहे. यावर्षी चांगला पाऊस पडेल असे भाकीत हवामान खात्याने वर्तविले होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी रखरखत्या उन्हात जिवाची जराही तमा न बाळगता लगबगीने पेरणीपूर्व मशागत केली. बाकीची सारी कामे बाजूला सारत शेतीचा हंगाम पूर्ण केला. जून महिन्याच्या सुरुवातीलाच हवामानात बदल झाल्याने यावर्षी मृग नक्षत्र सुरूवातीपासूनच बरसेल, अशी आस भोळ्याबापड्या शेतकऱ्यांना होती. त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी पाऊस येण्यापूर्वीच महागडे बियाणे जमिनीत टाकले. त्यानंतर जुन्या पहिल्याच आठवड्यात जिल्ह्यात दोन दिवस रिमझिम पावसाला सुरूवात झाली. मात्र त्यानंतर पाऊस कायमचा गायब झाला. पावसापूर्वीच जमिनीत टाकलेले महागडे बियाणे अपूऱ्या पावसामुळे व उन्हामुळे जमिनीची उब होऊन करपून गेले. उसनवारी व कर्ज घेऊन महागडे बियाणे जगविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू झाली. तुरळक पावसाने शेतकऱ्यांचा घात केला आहे. शेतकरी जिवाचे रान करीत आहे.बहुतांश शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय नसल्याने शेतकऱ्यांना निसर्गाच्या पाण्यावर शेती करावी लागत आहे. काही शेतकऱ्यांनी तुषार व ठिंबक सिंचनाच्या माध्यमातून पीक वाचविण्याची धडपड चालविली आहे. परंतु, ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय नाही या शेतकऱ्यांची करायचे काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. निसर्गाच्या पाण्याशिवाय त्यांच्याकडे कोणताच पर्याय उरला नाही. शेती दिवसेंदिवस बेभरवशाची झाल्याने शेतकऱ्यांवर कर्जाचा डोंगर वाढत आहे. (तालुका प्रतिनिधी)धूळ पेरण्या पावसाअभावी उलटणारमृग नक्षत्राचे १२ दिवस कोरडे : अंदाज चुकल्याने शेतकरी चिंतेतलाखनी/पालांदूर : हवामान खात्याने यंदा दमदार पावसाचा अंदाज वर्तविला मृग नक्षत्राच्या पहिल्याच दिवशी रात्री काही भागात मान्सूनपूर्व बरसल्याने काही ठिकाणी धूळपेरण्या आटोपल्या. पण आता बारा दिवसांपासून पाऊस गायब झाल्याने धूळपेरण्या उलटण्याचा धोका व्यक्त होत आहे. दुष्काळी चटके सहन करणाऱ्या संकटात यानिमित्ताने भर पडणार आहे.पावसाचा अंदाज घेऊन दरवर्षी जिल्ह्यातील शेतकरी धूळपेरणी करतात. पाऊस आल्यास शेतकऱ्यांचे फावत असल्याने अनेक वर्षांपासून हे केले जात आहे. यंदा वेधशाळेने तसेच स्लायमेटने दमदार पावसाचा अंदाज वर्तविला. शेतकरी उत्साहाने मशागतीच्या कामाला लागला मृग नक्षत्राच्या पहिल्याच दिवशी काही ठिकाणी धूळपेरण्या केल्या, पण नंतर पाऊस झालाच नाही. अंदाज चुकल्याने धूळपेरण्या वाया जाण्याची भीती व्यक्त होऊ लागली आहे.मृग कोरडे जाणार काय या काळजीने शेतकरी चिंतातुर झाला आहे. शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. किमान ७५ मि. मी.पाऊस झाल्यानंतरच पेरण्या कराव्यात, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. पण हंगाम लांबण्याच्या भीतीपोटी शेतकरी हा धोका पत्करत असल्याचेही सांगण्यात येते. (तालुका प्रतिनिधी/वार्ताहर)