शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

हमीभाव धान विक्री नोंदणी अडचणीत; ॲप काम करेना

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2024 11:31 IST

केंद्रांवर शेतकरी ताटकळत : नोंदणीसाठी मुदत वाढविण्याची अपेक्षा

लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : यंदा विधानसभा निवडणुकांमुळे शासनाने हमीभाव धान नोंदणी, उचल व भरडाईची मंजुरी एकाचवेळी दिली. यंदा जिल्ह्यात हमीभाव धान खरेदी केंद्रावर धान विक्री नोंदणीला नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून सुरुवात झाली आहे. परंतु, नोंदणीचे ॲप काम करीत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. परिणामी, शेतकऱ्यांच्या व कर्मचाऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. धान विक्री नोंदणीची अंतिम मुदत १५ नोव्हेंबर असल्याने या मुदतीत वाढ करण्याची अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.

जिल्ह्यात अनेक हमीभाव केंद्रांवर नोंदणीचे ॲप काम करीत नसल्याने शेतकऱ्यांना शेती कामे सोडून नोंदणीसाठी ताटकळत उभे राहावे लागत आहे. सध्या धान कापणी व मळणीची कामे जोमात आहेत. असे असताना हमीभाव केंद्रांवर धानाची विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांना नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणीची प्रक्रिया ऑनलाइन आहे. यासाठी स्वतंत्र ॲप तयार करण्यात आले आहे. यावर्षी ॲपमध्ये बरेच बदल करण्यात आले आहेत. केंद्र चालकांना बरीच माहिती व कागदपत्रे अपलोड करावी लागत आहेत. यासाठी शेतकऱ्यांना खरेदी केंद्रावर उपस्थित राहावे लागत आहे. 

नोंदणीसाठी लागतात सरासरी २० मिनिटे धान विक्री नोंदणीचे ॲप काम करीत नसल्याने नोंदणी प्रक्रियेला बराच वेळ लागत आहे. एका शेतकऱ्याच्या नोंदणीसाठी सरासरी २० मिनिटांपेक्षा अधिक कालावधी लागत आहे. दिवसभरात जास्तीत ३० ते ४० शेतकऱ्यांचीच नोंदणी होत आहे. मात्र, केंद्रावर दरदिवशी शेकडो शेतकरी दाखल होते आहेत. गर्दी टाळण्यासाठी शेतकऱ्यांना अर्ज स्वीकारल्यानंतर टोकन क्रमांक दिला जात आहे.

शासनाच्या लाभासाठी नोंदणी गरजेची शेतकऱ्यांचा होणारा त्रास वाचविण्यासाठी नोंदणी केंद्र चालकांकडून टोकन देत दोन ते चार दिवसांनंतर केंद्रावर नोंदणीसाठी येण्याचा सल्ला दिला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तीन ते चार चकरा माराव्या लागतात. शेतकऱ्यांना शासनाच्या अनुदानाचा अथवा बोनसचा लाभ मिळण्यासाठी नोंदणी आवश्यक असते.

गतवर्षीही मिळाली होती मुदतवाढ यंदा हमीभाव धान विक्री नोंदणीसाठी अंतिम दि. १५ नोव्हेंबरपर्यंत आहे. त्यामुळे मुदतीत नोंदणीसाठी शेतकरी गर्दी करत आहेत. मात्र, जोपर्यंत दिलेले उद्दिष्ट पूर्ण होत नाही, तोपर्यंत मुदतवाढ दिली जाणार आहे. गतवर्षीही फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ मिळाली होती.

व्यापाऱ्यांकडून होतेय शेतकऱ्यांची लूटधान विक्रीसाठी नोंदणीची प्रक्रिया आटोपल्यानंतर धान खरेदीला प्रारंभ होणार आहे. परंतु, पैशाची गरज भागविण्यासाठी शेतकरी व्यापाऱ्यांच्या चक्रव्यूहात फसताना दिसत आहेत. व्यापाऱ्यांकडून कमी दरात धानाची खरेदी केली जात आहे. व्यापाऱ्यांचे दलाल सक्रिय असल्याचे दिसून येत आहे. 

"जिल्ह्यात धान विक्रीसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू आहे. परंतु, अनेक केंद्रांवरील ॲप काम करीत नाही. त्यामुळे प्रक्रियेला विलंब लागत आहे. यावर उपाय म्हणून शासनाने नोंदणीची मुदत वाढविणे गरजेचे आहे."- आकाश गायधने, शेतकरी, मोहाडी

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रfarmingशेतीFarmerशेतकरीbhandara-acभंडारा