n लोकमत न्यूज नेटवर्कचिचाळ : पवनी तालुक्यात रेतीतस्कराने प्रशासनाच्या आशीवार्दाने डोक्यावर कातडे ओढल्याने रेती तस्करांची दबंगशाही वाढली आहे. सदर प्रकरणावर लोकमतने मालिका लावून धरल्याने जिल्हाधिकारी यांनी चौकशीचे आदेश दिल्याचे कळते. तीन दिवस रेती तस्करी बंद केली असली तरी रेतीचा उपसा गुडेगाव, भोजापुर , धानोरी येथे सुरु असुन रेतीमाफियाचा अड्डा बनला आहे.भंडारा जिल्ह्यात रेती घाट लिलाव नसतांना रेती चोरीला उच्चांक गाठला पवनी तहसील अंतर्गत येणाऱ्या गुंडेगाव भोजापूर व धानोरी येथे रेती तस्करांनी चोरीसाठी बस्तान मांडले असून तीनशेच्या वर ट्रक टिप्पर तालुका महसूल कार्यालयाच्या समोरूनच वाहतूक केली जाते याची माहिती महसूल प्रशासनाला असतानादेखील डोळ्यावर कातडे ओढले जात आहे परिणामी तस्करीचे प्रमाण वाढले असून सामान्य जनतेच्या महसूल घशात टाकणाऱ्या रेतीमाफियांना अभय मिळत असल्यामुळे कुंपणच शेत खाऊन टाकण्याच्या प्रकाराला चालना मिळत आहे. ‘लोकमत’ने रेती तस्करीबाबत मालिका लावून धरल्याने अवैद्य रेती चोरीचे बिंग फुटले. सदर प्रकरणावर जिल्हाधिकारी यांनी चौकशीचे आदेश दिल्याचे कळते त्या अनुषंगाने चार ते पाच दिवस रेतीची वाहतूक बंद केली असली तरी मात्र घाटावर रेतीचा डंपिंग करणे सुरू असल्याने सूत्रांकडून सांगण्यात आले आहे सदर प्रकरणावर क्षेत्राचे आमदार खासदार ही लोकप्रतिनिधींनी संबंधित प्रकरणावर मौन धारन केल्याने क्षेत्राचे पुढारी गप्प का असा प्रश्न नागरिक करीत आहेत.
अधिकारी सत्ताधाऱ्यांच्या दबावातपवनी तालुक्यामध्ये भारतीय जनता पक्षाने अवैधरित्या विरोधात आंदोलने केली आहेत वैनगंगा नदीची रेती नागपूरला नेली जाते यामध्ये राजकीय सत्ताधाऱ्यांच्या मोठा सहभाग आहे सत्तेच्या दबावाखाली तहसीलदार नीलिमा रंगारी यांनी पवनीची रेती संपविण्याचा विडा उचलला आहे या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पाटीर्ने अनेक आंदोलने केली आहेत जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आश्वासनानुसार रेतीची घाटे बंद केली असली तरी मात्र आजही रेतीची वाहतूक बंद असून नदीत नदीपात्रातून रेती काढून डम्पिंग केली त्यात आहे याकडे वरिष्ठांनी लक्ष द्यावे- राजेद्र फुलबांधे, भाजपा पवनी