शहरं
Join us  
Trending Stories
1
'काँग्रेसचा खरा चेहरा समोर आला', मल्लिकार्जुन खर्गेंच्या 'त्या' वक्तव्यावर PM मोदींचा घणाघात
2
अंधेरी पूर्वेत पंधरा ते वीस दुकानांना भीषण आग;कामगार अडकल्याची भीती, अग्निशमनच्या गाड्या दाखल
3
जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा टार्गेट किलींग; 2 बिगर कश्मिरी मजुरांवर दहशतवाद्यांचा गोळीबार
4
पाकिस्तानचे अध्यक्ष आसिफ अली झरदारी यांच्या पायाला दुखापत, दुबईत विमानातून उतरताना अपघात झाला
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: काटेवाडीत पाडवा का साजरा करणार? अजित पवारांनी कारणच सांगितलं, म्हणाले...
6
कॅनडामध्ये सुपरलॅबचा भंडाफोड, मोठ्या प्रमाणात ड्रग्ज आणि शस्त्रे जप्त, भारतीय वंशाच्या व्यक्तीला अटक
7
३०० कंटेनरचे सामूदायिक लक्ष्मीपूजन; सांगवीच्या तरुणांकडे ४५० कंटेनरची मालकी
8
"बाळासाहेब असते तर थोबाड फोडलं असतं"; अरविंद सावंतांच्या वक्तव्यावर CM शिंदेंची प्रतिक्रिया
9
ऐन दिवाळीत मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी दोन्ही पवारांची धावाधाव
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सांगली विधानसभेत महाविकास आघाडीला धक्का! जयश्री पाटील निवडणूक लढवण्यावर ठाम
11
Maharashtra Election 2024: नाशिक पूर्वमध्ये थेट सामना; अन्य तीन मतदारसंघात तिरंगी, चौरंगी लढत
12
Muhurat Trading : मुहूर्त ट्रेडिंगनंतर तेजीसह बाजार बंद, 'या' १० शेअर्समध्ये जोरदार खरेदी, गुंतवणूकदारांनी कमावले ४ लाख कोटी
13
Mumbai Crime: फटाके फोडण्याच्या वादातून तरुणाची हत्या, मुंबईतील धक्कादायक घटना
14
जरांगेंच्या यादीला ओबीसींची यादी तयार, जो तो उठतोय त्यांनाच भेटायला जातोय; लक्ष्मण हाकेंनी रणशिंग फुंकले
15
किंग कोहलीची 'विराट' चूक; मैदानात थांबण्यापेक्षा चोरटी धाव घेण्याच्या नादात फसला (VIDEO)
16
पोस्टर'वार'! योगी आदित्यनाथ यांच्या 'बटेंगे तो कटेंगे'ला अखिलेश यादवांकडून पलटवार
17
भीषण! पाकिस्तानमध्ये मोठा बॉम्बस्फोट; ५ शाळकरी मुलं आणि एका पोलिसासह ७ जणांचा मृत्यू
18
'लॉरेन्स बिश्नोईने मला लवकर मारावे...', खासदार पप्पू यादव असं का म्हणाले?
19
IND vs NZ, 3rd Test Day 1 Stumps : फलंदाजांमुळे टीम इंडिया अडचणीत; ८६ धावांत गमावल्या ४ विकेट्स
20
"चुकीची चिठ्ठी काढणारा पोपट, आजपर्यंत...!"; शंभूराज देसाई यांचा संजय राऊतांना टोला

गुरुजी शाळेत येतो आम्ही, पण बस आल्यावर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2021 5:00 AM

ग्रामीण भागातील मुलींनी बसअभावी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी शासनामार्फत मानव विकास योजनेंतर्गत बससेवा सुरू करण्यात आली आहे. भंडारा विभागांतर्गत असलेल्या साथ आगारात भंडारा गोंदिया जिल्ह्यातील विविध मार्गावर ९१ एसटी बस  धावतात. मध्यंतरी कोरोनामुळे या बसचे नियोजन कोलमडले होते; परंतु कोरोनाबाधितांची संख्या कमी झाली आणि आता  शाळाही सुरू झाल्या. शाळा सुरू झाल्याने मानव विकासअंतर्गतच्या बस पूर्ववत सुरू करण्यात आल्या आहेत. या बसना ग्रामीण भागातील शालेय मुलीचाही प्रतिसाद मिळत आहे.

संतोष जाधवरलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : मानव विकास योजनेंतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात आजही एसटी बस धावत आहेत. शासनाने टप्प्याटप्प्याने शाळा, महाविद्यालये सुरू केल्याने अनेक विद्यार्थी एसटी बसने प्रवास करतात. त्यातच कोरोनाबाधितांची संख्याही कमी झाल्याने शालेय मुलींचाही या बसला प्रतिसाद मिळत आहे.ग्रामीण भागातील मुलींनी बसअभावी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी शासनामार्फत मानव विकास योजनेंतर्गत बससेवा सुरू करण्यात आली आहे. भंडारा विभागांतर्गत असलेल्या साथ आगारात भंडारा गोंदिया जिल्ह्यातील विविध मार्गावर ९१ एसटी बस  धावतात. मध्यंतरी कोरोनामुळे या बसचे नियोजन कोलमडले होते; परंतु कोरोनाबाधितांची संख्या कमी झाली आणि आता  शाळाही सुरू झाल्या. शाळा सुरू झाल्याने मानव विकासअंतर्गतच्या बस पूर्ववत सुरू करण्यात आल्या आहेत. या बसना ग्रामीण भागातील शालेय मुलीचाही प्रतिसाद मिळत आहे.कोरोना संसर्गामुळे गेल्या दीड वर्षापासून शालेय विद्यार्थी शाळेत गेले नव्हते. मात्र आता शासनाच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांसह पालकांना दिलासा मिळाला आहे. मात्र ग्रामीण भागातील विद्यार्थीनींना शहराच्या ठिकाणी शाळा, महाविद्यालयात जाण्यासाठी अडचणी येत होत्या. मात्र आता एसटी महामंडळाने मानव विकास अंतर्गत असलेल्या बसेस सुरू केल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थीनींना दिलासा मिळत आहे. काही भागात कमी विद्यार्थ्यांची संख्या असली तरीही एसटी महामंडळ तोटा सहन करून ही योजना राबवित आहे. तर दुसरीकडे शासन मात्र एसटी महामंडळाला मदतीसाठी टाळाटाळ करत असल्याचे वास्तव आहे. शालेय विद्यार्थ्यांसह वयोवृद्ध नागरिकांना पास, सवलत तसेच तिकीटामध्ये सवलतीच्या विविध योजना एसटी महामंडळाकडून आजही सुरू आहेत.

मुख्याध्यापकांना एसटी अधिकाऱ्यांचे आवाहनभंडारा आगारांतर्गत असलेल्या भंडारा, पवनी, तुमसर, साकोली, गोंदिया, तिरोडा आगारातून अनेक बस विद्यार्थ्यांसाठी धावत आहेत. मात्र काही भागात विद्यार्थ्यांच्या उपस्थितीअभावी बसेस धावत नाहीत. मानव विकास अंतर्गत भंडारा विभागातून सहा आगारातून ९१ बसेस आजघडीला धावत आहेत. याबाबत मुख्याध्यापकांना कोणतीही गरज भासल्यास आगार प्रमुखांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

मानव विकासच्या बसमुळे होते मदत...

आमच्या गावापासून शाळा तीस किलोमीटर अंतरावर आहे. एसटी बस नसल्याने यापूर्वी मुलीची गैरसोय होत होती; परंतु मानव विकास मिशनच्या बस सुरू झाल्या आहेत. त्यामुळे आता आम्हा मुलींना होणारा त्रास कमी झाला आहे.-नफिसा मुजावर, मोहाडी 

ग्रामीण भागातील मुलींची शैक्षणिक गैरसोय दूर करण्यासाठी शासनाच्या वतीने मानव विकास मिशनच्या बस सुरू केल्या आहेत. या बसमुळे अनेक  मुलींना महाविद्यालयात शिक्षणासाठी जाणे अधिक सोयीचे होत आहे. बस अशाच कायम सुरू राहाव्यात. -माही गिरेपुंजे, खरबी नाका

मानव विकासअंतर्गत भंडारा आगारात ७, तिरोडा ७, गोंदिया २८ , साकोली २८, तुमसर १४,  पवनी आगारात ७ अशा सहाही आगारांतर्गत मानव विकास मिशनच्या ९१ बस सुरू आहेत. अनेक विद्यार्थिनी याचा लाभ घेत आहेत. अधिक माहितीसाठी मुख्याध्यापकांनी आगारप्रमुखांशी संपर्क साधावा. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार आणखी बस वाढवण्याचे नियोजन केले जात आहे. -डॉ. चंद्रकांत वडस्कर, विभागीय वाहतूक अधिकारी, भंडारा.

 

टॅग्स :Schoolशाळाstate transportएसटी